Jammu and Kashmir Assembly Election Result :370 कलम हटवूनही 'या' कारणांनी BJPच्या हातून गेले काश्मिर
Jammu and Kashmir Assembly Election Result : जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत झाली. जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास सर्व मतमोजणीचे सर्व कल हाती आले आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स 35, भाजप 28, काँग्रेस 14, पीडीपी 3 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे.
भाजपची झोळी राहिली रिकामीच...
भाजपसाठी जम्मू आणि काश्मीरची ही निवडणूक महत्वाची होती. कारण जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आल्याने याचा भाजपला फायदा होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र जम्मूमध्ये भाजपला अल्प प्रतिसाद मिळाला, तर काश्मीर खोऱ्यातही भाजपची झोळी रिकामीच राहली. हे असे का झाले त्याची अनेक कारणे सांगता येतात.

370 चा निर्णय लोकांना आवडला नाही
केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये, कलम 370 रद्द केले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जाच रद्द केला नाही, तर त्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केले. हे सर्व केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महिने अनेक निर्बंध लागू राहिले. जेव्हा परिस्थिती थोडी सामान्य होऊ लागली, तेव्हा मोदी सरकारने विकास, नोकऱ्या आणि सुरक्षिततेचे आश्वासन दिले.
एक्झिट पोलच्या विरुद्ध हरियाणातील निकाल, सोशल मीडियावर 'जिलेबी' मीम्सचा का पडतोय पाऊस, वाचा
दुसरीकडे, फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने कलम ३७० ला 'काश्मीरी अस्मिता'शी जोडले. या पावलाचे काश्मीर विरोधी असे वर्णन करण्यात आले. असे मानले जाते की, आताही केवळ काश्मीरच नाही, तर जम्मूचीही मोठी लोकसंख्या कलम 370 हटवण्याच्या विरोधात आहे.
'नया काश्मीर' लोकांना आवडलाच नाही
भाजपने 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरमध्ये 'नया काश्मीर'चा नारा दिला. सुरक्षेवर अधिक भर देण्यात येईल असे सांगितले. दहशतवाद, फुटीरतावाद आणि दगडफेकीच्या विरोधात सरकारने केलेल्या कारवाईचे लोकांनी स्वागत केले. पण दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले जात असल्याची चर्चाही त्यामुळे वाढली. मतभिन्नता दडपण्यासाठीत धमक्यांचा वापर केला जात असल्याचा समज, विरोधकांनी सामान्यांमध्ये निर्माण केला. याच कारणामुळे काश्मीर खोऱ्यात भाजप अपेक्षेप्रमाणे उदयास येऊ शकला नाही.
ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार- फारुक अब्दुल्लांचे वक्तव्य, बडगाममधून ओमर यांचा विजय, NC ची घौडदौड
नोकऱ्यांचे आश्वासन अपूर्णच राहिले!
काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर भाजपने नाराजी दूर करण्यासाठी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. काश्मीरमध्ये सरकार गुंतवणूक आणेल, ज्यामुळे रोजगार निर्माण होतील, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, या आश्वासनांवर फारसे काम झाले नाही, त्यामुळे जनतेचा रोष वाढला. या सगळ्या कारणांमुळे भाजपला जम्मू-काश्मिरच्या लोकांनी फारसे काही प्रमाणात नाकारले, अशी चर्चाही आता होऊ लागली आहे.
मित्रपक्षही ठरले अपयशी
निवडणुकीतील फायद्यासाठी भाजपने अल्ताफ बुखारी यांची अपनी पार्टी आणि सज्जाद लोनची पीपल्स कॉन्फरन्स यांसारख्या पक्षांसोबत युती केली. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पक्षांसोबतची युती भाजपसाठी फारशी लाभदायक ठरली नाही.
Haryana, J&K Election Results 2024 Live: भाजप तिसऱ्यांदा हरियाणाची सेवा करण्यास तयार- नायब सैनी












Click it and Unblock the Notifications