ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार- फारुक अब्दुल्लांचे वक्तव्य, बडगाममधून ओमर यांचा विजय, NC ची घौडदौड
Jammu And Kashmir Assembly Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे नँशनल काँन्फरन्सची सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरु आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, JKNC उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी बडगाम मतदारसंघातून 18,485 जागांनी विजय मिळवला आहे. तर अजूव गांदरबलमध्येही ते निवडणूक लढवत आहेत तिथे निकाल येणे बाकी आहे.
ओमर अब्दुल्ला जम्मू - काश्मीरचे मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य त्यांचे वडील आणि नॅशनल काॅन्फरन्सचे दिग्गज वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या विजयानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे चांगलेच राजकारण तापले होते. काश्मीरमध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व त्यापाठोपाठ कॉंग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. काश्मीरमधील लोकांनी स्थानिक पक्षांवरच विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. काश्मीरमध्ये सध्या जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची आघाडी दिसून येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील काही महत्त्वाच्या मतदारसंघाची आकडेवारी समोर आली आहे.
गांदरबलमध्ये ओमर अब्दुल्लांना तगडी फाईट
जम्मू आणि काश्मीरमधील १८ गांदरबल हा मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे. तेथे काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यामध्ये चुरशीची लढत सुरु आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे स्वतः या मतदारसंघातून उभे असून सध्या तेच आघाडीवर आहेत. साडेचार हजारांहून अधिक मतांनी ओमर अब्दुल्ला हे आघाडीवर आहेत. येथे तेच विजयी होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ओमर अब्दुल्ला यांनी सकाळी मतमोजणीपासून सुरु झाल्यापासून आघाडीवर आहेत. ओमर अब्दुल्ला यांना बशीर अहमद मीर हे जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये चार हजार मतांचा फरक आहे. बशीर अहमद मीर हे जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आहे. गांदरबल विधानसभा मतदारसंघामध्ये नोटाला देखील मतदान करण्यात आलं आहे. 521 मतं ही नोटाला पडली आहे.
भाजपच्या खेळीबाबत अब्दुल्ला यांना शंका
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. आपलाच पक्ष जम्मू काश्मिरमध्ये सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही विजयी होऊ अशी खात्री वाटते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी जे ठरवले आहे, ते दुपारपर्यंत कळेलच. पण निकालात पारदर्शकता असायला हवी. जनतेचा कौल स्वीकारला गेला पाहीजे. जर लोकांचा कौल भाजपाच्या विरोधात असेल, तर त्यांनी जुगाड वैगरे केला नाही पाहीजे. राजभवनाने कोणताही हस्तक्षेप न करता लोकांचा कौल स्वीकारावा." असे मत ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.












Click it and Unblock the Notifications