Haryana, J&K Election Results 2024 : देशीविरोधी आंतरराष्ट्रीय कटात कॉंग्रेचा सहभाग- Pm मोदी
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. हरियाणात भाजपाने विजयाची हॅट्रिक केली आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भाजपचे नेते आणि जनतेचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन केले. पक्षाच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी कार्यकर्ते व जनतेला दिले.
भाजपचे 'सबका साथ सबका विकास' हे धोरण पुन्हा एकदा योग्य ठरले आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. हा भाजपचा नाही तर जनतेचा विजय असल्याचे पंतप्रधानांनी मंचावर सांगितले. विकास आणि शांतता आणि स्थैर्यासाठी लोकांनी पुन्हा एकदा मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्यांनी सांगितले.

"गीताच्या भूमीवर सत्याचा विजय झाला. विकास आणि सुशासनचा विजय झाला आहे. समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी भाजपाला मतदान केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर शांततेत निवडणूक पार पडली आहे. हा, भारताच्या संविधानाचा विजय असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितले"












Click it and Unblock the Notifications