एक्झिट पोलच्या विरुद्ध हरियाणातील निकाल, सोशल मीडियावर 'जिलेबी' मीम्सचा का पडतोय पाऊस, वाचा

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जसेजसे समोर येत आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर आता जिलेबी ट्रेंड झाली आहे. सोशल मीडियावर जिलेबीवरुन मीम्सचा पाऊस पडू लागला आहे. निवडणुकाच्या निकालानंतर आता सोशल मीडियावर जोरदार मीम्स व्हायरल होऊ लागल्या असू यातून कॉंग्रेसवर निशाणा साधला जाऊ लागला आहे.

मुळात जीलेबीची कहाणी सुरू झाली ही निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केलेले जिलेबीच्या कौतुकाची अन् त्यावर केलेल्या विधानावरुन.हरियाणातील गुहाना येथे निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी एका सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रसिद्ध 'माटू राम' जिलेबीचा बॉक्स भेट दिला होता. राहुल गांधी यांनी मंचावरून या जिलेब्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या निर्यातीच्या शक्यतांवर चर्चा केली. या मोठ्या कारखान्यात बनवल्या तर रोजगार वाढून देशांतर्गत आणि परदेशातही निर्यात करता येईल, असे ते म्हणाले.

Rahul Gandhi

या विधानामुळे राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि निवडणुकीच्या निकालादरम्यान ही जलेबी पुन्हा चर्चेत आली. लोक निवडणुकीच्या निकालाची तुलना जिलेबीशी करत आहेत, कारण सकाळी ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर असतानाच दुपारपर्यंत या मजेशीर परिस्थितीबाबत सोशल मीडियावर अनेक विनोदी कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+