पाकिस्तानच्या माजी खासदारावर भारतात आईसक्रिम विकण्याची वेळ! का झाली ही परिस्थिती? जाणून घ्या
India Pakistan Conflict Former Pakistani MP Dabaya Ram : परिस्थिती कधी कुणासोबत कशी वागेल हे सांगता येत नाही. एकीकडे नागपूरमध्ये रिक्षा चालवणारा युपीत आमदार बनतो तर पाकिस्तानमध्ये एका खासदाराला भारतात चक्क गाडीवर आईसक्रिम विकण्याची वेळ आली आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अशा स्थितीत देशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर जाण्याचे सांगण्यात आले आहेत. भारत सरकारने तसे आदेश दिले आहेत, त्यानुसार पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतत आहेत.

हरियानाच्या फतेहाबाद येथे एक पाकिस्तानचे माजी खासदार डबाया राम आणि त्यांचा पुर्ण परिवार राहत आहे. भारतात राहणाऱ्या या परिवारात एकूण सहा लोक आहेत, त्यांना आता भारताची नागरिकता मिळाली आहे.
का आहेत चर्चेत डबाया राम?
डबाया राम हे पाकिस्तानचे माजी खासदार आहेत. सध्या ते भारतात आईसक्रिम विकत असल्याने चर्चेत आहेत. ते सध्या हरियानातील रतिया येथील रतनगढ या छोट्या गावात राहतात आणि गल्लोगल्ली आईसक्रिम विकतात.
डबाया राम भारतीय कि पाकिस्तानी?
डबाया राम हे भारतीय आहेत की पाकिस्तानी हा प्रश्न आहे. त्यांचा जन्म फाळणीच्या 2 वर्ष आधी झाला आहे. फाळणीनंतर त्यांचा परिवार पाकिस्तानातच राहीला होता. 1988 ला झालेल्या पाकिस्तानातील निवडणुकीत ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लोहीया आणि बखर येथून बिनविरोध खासदार झाले होते. त्यांनी पिपल्स पक्षाच्या तेव्हाच्या पंतप्रधान पदाच्या नेत्या बेनझीर भुट्टो यांना मत दिलं होते. त्यानंतर ते भारतात आले आणि त्यांना भारतीय नागरिकता मिळाली आहे.
का आले भारतात डबाया राम आणि त्यांचा परिवार?
पाकिस्तानात डबाया राम यांच्या कुटुंबासोबत अमानुष घटना घडली होती असे सांगितले जाते नेमकी काय घटना घडली हे मात्र स्पष्ट झाले नाही पण 2000 साली त्यांच्यासह एकूण 13 कुटुंब भारतात आली होती. ते जवळपास 35 लोकं होती हे सर्व रतनगढ या गावी राहायला आले, त्यांनी अधिकृतरित्या व्हिजाही मिळवला होता.त्यातील काहींना चौकशीनंतर परत पाठवण्यात आले होते.
हेही वाचा : 'पाकिस्तान को नानी याद आएगी!' भारताने एक पाऊलं उचललं तर अवघ्या 300 मिनिटांत 3 लाख लोक झाले कंगाल!
हेही वाचा : Pakistan News एकही युद्ध जिंकलं नाही, मग पाकिस्तान त्यांच्या सैनिकांना पदके कशासाठी देतो? घ्या जाणून
हेही वाचा : भारताच्या हल्ल्याची भिती! पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचा पूर; 2 दिवसांत 5 हजार जवानांनी सोडली नोकरी












Click it and Unblock the Notifications