Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियाला बीसीसीआयकडून 125 कोटीचं बक्षीस

मुंबई :विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमराह यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला बक्षिस म्हणून जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचा चेक देण्यात आला.

प्रत्येक विश्वचषक खास असतो

माझ्यासाठी प्रत्येक विश्वचषक खास आहे. 2007 मध्ये विश्वचषक कसा जिंकायचा हे आम्हीच जगाला दाखवून दिलं. 2011 मध्ये आम्ही वानखेडे स्टेडियमवर जिंकलो, त्यामुळे तेही खास होते. 2013 मध्येही आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि वानखेडेवर तो साजरा केला, तोही आमच्यासाठी खास होता असं रोहित शर्मा म्हणाला.

राहूल द्रविडने खेळाडूंचे कौतुक केले

हे खेळाडू माझ्यासाठी कुटुंब आहेत. या खेळाडूंनी जे केले ते अतुलनीय होतं.आपल्या सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे. या खेळाडूंनी नेहमीच चांगले होण्यावर भर दिला. रोहितने या संघाचे नेतृत्व केले आणि मला या संघाचे प्रशिक्षक म्हणून अभिमान वाटतो. मला या प्रेमाची आठवण येईल. आज आम्हाला ज्या प्रकारचे प्रेम मिळाले आहे, आम्ही विमानतळावर उतरलो तेव्हापासून लोकांनी दिलेले प्रेम आश्चर्यकारक आहे.

विराटने केले बुमराहचे कौतुक

टीम गोलंदाज जसप्रीत बुमराहाचे विराट कोहलीने कौतूक केले आहे. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाचे पुनरागमन करणाऱ्या खेळाडूसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवाव्यात, तो म्हणजे जसप्रीत बुमराह. अंतिम फेरीत शेवटच्या पाच षटकांपैकी दोन षटकं गोलंदाजी करून अप्रतिम पुनरागमन केले. बुमराह हा शतकातील सर्वोत्तम गोलंदाज आहे.

रोहितला इतका भावूक कधीच पाहिला नाही

कोहली म्हणाला, मला इंटरनेट ब्रेकिंगबद्दल माहिती नाही, पण माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मी रोहितला इतका भावूक झालेला पाहिला नाही. मी ड्रेसिंग रूममध्ये जात होतो आणि रोहित बाहेर येत होता. दोघेही भावुक झालो आणि एकमेकांना मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी खास असेल

मरिन ड्राइव्हवरून विजयी मिरवणूक काढून भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आहे. बीसीसीआय वानखेडेवर जगज्जेत्या संघातील खेळाडूंचा गौरव करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केलं आहे. वानखेडे स्टेडियमवरही चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.

विश्वविजेत्या टीम इंडियाची बसमधून विजयी मिरवणूक वानखेडे स्टेडियवर येऊन पोहोचली आहे. चाहत्यांना खेळाडू अभिवादन करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्रॉफी उचलली आणि मुंबईत त्यांची विजयी परेड पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांना ती दाखवली. रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी चाहत्यांसमोर एकमेकांना मिठी मारली आणि मोठ्या उत्साहात दिसले. या दोन दिग्गज खेळाडूंना एकत्र पाहिल्यानंतर उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

ओपन बसमध्ये संपूर्ण टीम इंडियाचे खेळाडू आहेत. मरीन ड्राईव्हकडून वानखेडे स्टेडियमकडे विजयी मिरवणूक जात आहे. चाहते आपल्या लाडक्या खेळाडूचे चित्र टिपण्यासाठी धडपडत आहेत. मरीन ड्राईव्हर चाह्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे.

मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाहतुकीचे कोणतेही गैरव्यवस्थापन किंवा गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. आज मरीन ड्राईव्ह आणि आजूबाजूला योग्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत.

विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झालं आहे. टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावरुन बसमध्ये बसून मरिन ड्राईव्हकडे रवाना झाली आहे. थोड्याच वेळात विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लवकरच येथे त्यांची विजयी परेड होणार आहे.

विमानतळ प्रशासनाकडून टीम इंडियाला वॉटर सलामी देण्यात आली.

बस मध्ये बसून मुंबई विमानतळामधून मरीन ड्राईव्हसाठी निघणार आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्तानात करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्हवर येऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून चाहत्यांना कऱण्यात येत आहे. मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर लोकांची प्रचंड झाली आहे.

मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे.पाय ठेवायला जागा नाही. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

वानखेडे स्टेडियम चाहत्यांच्या गर्दीने तुंडूब भरलं आहे. चाहत्यांनी रोहीत शर्माच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. इंडिया का राजा रोहीत शर्मा या घोषणेने स्टेडियम दणावून सोडलं आहे.

टीम इंडियाच्या भव्य स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे.क्रिकेट चाहते वानखेडेवर पोहोचू लागले आहेत. टीम इंडिया मुंबईत पोहोचण्याआधीच क्रिकेट चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम गाठायला सुरुवात केली आहे.

Team India

4 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमध्ये टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची विजय परेड होणार आहे.

टीम इंडियाची विजयी मिरवणूक मरीन ड्राईव्ह येथून निघणार आहे. थोड्याच वेळात या मिरवणुकीला सुरुवात होईल. हा सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी आता होऊ लागली आहे. ही मिरवणूक मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकल्याने संपूर्ण देश आनंदी आहे. 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने विश्वचषक जिंकला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारत दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन बनला.या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. यावेळी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे खेळाडू आणि प्रशिक्षकासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांच्या पंतप्रधान मोदी यांनी ब्रेकफास्ट सुध्दा केला आहे. यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली. दुपारी 4 च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+