Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत

Lpg Crysis How to do lpg e kyc online : एलपीजी गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) अनिवार्य केले आहे. सध्या मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असताना, सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जर तुम्ही वेळेत e-KYC पूर्ण केले नाही, तर तुमची गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आणि बुकिंग थांबवले जाऊ शकते.

Lpg Crysis How to do lpg e kyc online

घरबसल्या e-KYC कसे करावे? (स्टेप-बाय-स्टेप)

आता तुम्हाला गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तुम्ही खालील पद्धतीने घरीच ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

१. ॲप डाउनलोड करा: सर्वप्रथम तुमच्या गॅस कंपनीचे (Indane, Bharat Gas किंवा HP Gas) अधिकृत मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.

२. FaceRD ॲप: यासोबतच गुगल प्ले स्टोअरवरून 'Aadhaar FaceRD' हे ॲप देखील डाउनलोड करा.

३. लॉगिन करा: गॅस कंपनीच्या ॲपमध्ये तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.

४. चेहरा स्कॅन करा: ॲपमधील e-KYC पर्यायावर क्लिक करा. Aadhaar FaceRD ॲपच्या मदतीने तुमचा चेहरा स्कॅन करा.

५. सबमिट करा: माहिती पडताळून सबमिट करा. तुमची e-KYC प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

का महत्त्वाचे आहे हे e-KYC?

  • बोगस कनेक्शन: बनावट किंवा एकाच नावावर असलेल्या अनेक गॅस कनेक्शनला आळा बसणार आहे.
  • सुरळीत पुरवठा: केवळ अधिकृत ग्राहकांपर्यंतच गॅस पोहोचला पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे.
  • सबसिडी: गॅसची सबसिडी थेट बँक खात्यात येण्यासाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे.
  • सावधान: सध्या अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याने लोक साठा करत आहेत. अशा अफवांना बळी न पडता आपले रेकॉर्ड अपडेट ठेवण्याचे आवाहन वितरकांनी केले आहे.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+