Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट
Oscars 2026 Winners List : चित्रपटसृष्टीतील जगातील सर्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांची (Oscars 2026) घोषणा झाली आहे. यंदाच्या सोहळ्यात 'वन बॅटल आफ्टर अनदर' (One Battle After Another) या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक महत्त्वाच्या श्रेणींमध्ये बाजी मारली आहे. दुसरीकडे, भारताच्या पदरी मात्र निराशा आली असून दिग्दर्शिका गीता गांधबीर यांचे ऑस्करचे स्वप्न अधुरे राहिले आहे. जाणून घ्या, यावर्षी कोणाकोणाला सुवर्ण बाहुलीवर आपले नाव कोरता आले.

प्रमुख विजेत्यांची यादी (Oscars 2026 Full List)
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture): * विजेता: वन बॅटल आफ्टर अनदर (One Battle After Another)
२. सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor): विजेता: मायकल बी. जॉर्डन (चित्रपट: सिनर्स - Sinners)
३. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress): विजेता: जेसी बकली (चित्रपट: हॅमनेट - Hamnet)
४. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (Best Director): विजेता: पॉल थॉमस अँडरसन (चित्रपट: वन बॅटल आफ्टर अनदर)
५. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (Best Supporting Actor): विजेता: शॉन पेन (चित्रपट: वन बॅटल आफ्टर अनदर)
६. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (Best Supporting Actress): विजेता: एमी मॅडिगन (चित्रपट: वेपन्स - Weapons)
इतर महत्त्वाचे पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म: Kpop डीमन हंटर्स (Kpop Demon Hunters)
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स: अवतार: फायर अँड ॲश (Avatar: Fire and Ash)
- सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (Original Screenplay): सिनर्स (Sinners)
- सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन: फ्रँकेन्स्टाईन (Frankenstein)
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर: मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतिन (Mr. Nobody Against Putin)
भारतीयांची नाराजी: धर्मेंद्र यांना श्रद्धांजली नाही!
यावेळच्या ऑस्कर सोहळ्यातील 'इन मेमोरियम' (In Memoriam) विभागात भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा समावेश न केल्याने भारतीय चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गीता गांधबीर यांना ऑस्कर पुरस्काराची हुलकावणी!
ऐतिहासिक नामांकन
गीता गांधबीर यांनी एकाच वर्षात 'सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर' आणि 'सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट' अशा दोन्ही श्रेणींमध्ये नामांकन मिळवून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला दिग्दर्शिका ठरल्या, ज्यामुळे त्यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा होत्या.
चाहत्यांच्या पदरी निराशा
गीता गांधबीर यांच्या 'द डेव्हिल इज बिझी' (The Devil Is Busy) या लघुपटासह दोन्ही श्रेणीतील कलाकृतींना ऑस्कर पुरस्कार मिळवण्यात अपयश आले. ही दोन्ही पारितोषिके इतर चित्रपटांना मिळाल्याने गीता गांधबीर आणि भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा आली.
हेही वाचा : Oscars 2025:ऑस्कर ट्राॅफी बनवायला लागतो एवढा अवाढव्य खर्च; विकायला काढल्यास मिळतात चिल्लर पैसे! वाचा












Click it and Unblock the Notifications