खळबळजनक! अंबादास दानवे यांना ठार मारण्याची' धमकी! अज्ञात व्यक्तीकडून मध्यरात्री शिवीगाळ

Ambadas danve death threat : शिवसेना (UBT) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री फोन करून दानवेंना अश्लील शिवीगाळ करत 'कापून टाकू, ठोकून टाकू' अशा भाषेत धमकावले आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 'एनसी' (NCR) नोंदवली आहे.

Ambadas danve death threat

नेमकी घटना काय?

अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातील माहितीनुसार, त्यांना ९५९५९५९३०३ या मोबाईल क्रमांकावरून ११ मार्चपासून सतत फोन येत होते. सुरुवातीला अपरिचित नंबर असल्याने त्यांनी फोन उचलले नाहीत. मात्र, १५ मार्च रोजी रात्री उशिरा (सुमारे १:५४ ते २:०० च्या दरम्यान) पुन्हा त्याच नंबरवरून सलग फोन आले. कोणाची काही अडचण असावी या भावनेतून दानवे यांनी फोन उचलला असता, समोरून दोन-तीन व्यक्तींनी त्यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पोलिस तक्रार आणि कलम

या धमकीच्या सत्रानंतर दानवे यांचे स्वीय सहाय्यक गणेश भगवान म्हस्के यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी कलम: ३५१ (I) BNS (भारतीय न्याय संहिता) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विरोधी पक्षनेत्यासारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे उघडपणे धमक्या दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दानवे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, या घटनेमुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+