IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेते खेळाडू पांढरे जॅकेट का घालतात? यामागचे कारण काय, घ्या जाणून
IND Vs Nz Why Champions Trophy winners wear white jackets : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना जिंकून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने 252 धावांचे लक्ष्य गाठून दमदार विजय मिळवला तर किवी संघाचे चॅम्पियन ट्राॅफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. भारताने किवी संघासोबत आपली जुनी धावसंख्याही सेटल केली. 25 वर्षांपूर्वी टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता त्याच फायनलमध्ये गांगुली कर्णधार होता.
विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय कर्णधाराने ट्रॉफी उचलली. यापूर्वी भारतीय संघाला विजयानंतर पांढरे जॅकेट देण्यात आले होते. टीम इंडियाचे खेळाडू पांढरे जॅकेट परिधान करून एकामागून एक आले आणि ट्रॉफी उचलली. यामागेही एक कारण आहे.

टीम इंडियाला पांढरे जॅकेट का दिले गेले आहे पण किवी संघाला असे जॅकेट का मिळाले नाही. शेवटच्या वेळी 2017 मध्ये पाकिस्तानी संघालाही पांढरे जॅकेट घालायला मिळाले होते. विजेत्या संघाचे खेळाडू पांढरे जॅकेट का घालतात.. त्याचे कारण काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
IND vs NZ: पांढरे जॅकेट चॅम्पियन संघाला का दिले जाते?
हे धोरणात्मक उत्कृष्टता, दृढनिश्चय आणि यशाचा वारसा दर्शवते. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, पांढरे जाकीट चॅम्पियन संघासाठी सन्मानाचे चिन्ह आहे. हे धोरणात्मक प्रतिभेच्या अथक प्रयत्नाचे आणि पिढ्यांना प्रेरणा देणारा वारसा दर्शवते.
हेही वाचा : Champions trophy 2025 : आतापर्यंत कुणी कितीवेळा ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले? घ्या जाणून
IND vs NZ: दुबईत टीम इंडियाचा धमाका
हेच कारण आहे की विजेत्या संघाला हे जॅकेट आदराची खूण म्हणून परिधान करण्यासाठी दिले जाते आणि पराभूत संघासाठी असे होत नाही. दुबईत टीम इंडियाला विजयाची नोंद केल्यानंतर पांढरे जॅकेट घालण्यासाठी देण्यात आले, तर किवी संघाला जॅकेट मिळाले नाही. भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला, इतर कोणत्याही संघाला हे विजेतेपद तीनदा जिंकता आले नाही.
हेही वाचा : Champions Trophy 2025 : पाकचा जळफळाट! भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला दिल्या 3 वेदना
टिम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. भारताचे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावर स्टंप घेऊन दांडिया खेळताना दिसले. याशिवाय अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांचा भांगडाही पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : IND vs NZ : विराटने मोहम्मद शमीच्या आईला भेटताच केला चरणस्पर्श, नमस्काराचा हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल












Click it and Unblock the Notifications