Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ : विराटने मोहम्मद शमीच्या आईला भेटताच केला चरणस्पर्श, नमस्काराचा हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

IND vs NZ Kohli met Mohammed Shami's mother : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात दमदार विजय मिळवत न्युझीलंडचा पराभव केला. या विजयाने भारताने चॅम्पियन ट्राॅफी खिशात घातली. टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र आहे, त्यामुळे मैदानावरही कुटुंबियांचा आनंद पाहायला मिळाला. मोहम्मद शमी प्रथमच आयसीसी स्पर्धा विजेत्या संघाचा सदस्य बनला आहे. त्याचा आनंदही एका वेगळ्याच स्तराचा होता, विजेतेपदातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

विजयाच्या जल्लोषात मग्न असलेले टीम इंडियाचे काही कुटुंबीय तिथे दिसले. त्यांच्यामध्ये मोहम्मद शमीची आई देखील होती. टीम इंडियाचा रन मशीन म्हणजेच विराट कोहलीने शमीच्या आईची भेट घेतली, त्यावेळी कोहलीही होता.

IND vs NZVirat Kohli met Mohammed Shami s mother

मोहम्मद शमीच्या आईकडे तो आणि विराट कोहली सोबत गेले तेव्हा शमीच्या आईला पाहून विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य तर होतेच पण आनंदही ओसंडून वाहत होता. जेव्हा आईजवळ कोहली आला आणि शमीने जेव्हा कोहलीची त्याच्या आईशी ओळख करून दिली तेव्हा त्याने आईच्या पायाला स्पर्श केला आणि नमस्कार करत त्यांचे आशीर्वादही घेतले. त्याचा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोहलीच्या या वागण्याचं सर्वांकडून कौतुक

विराट कोहलीच्या या वागण्याचं सर्वांकडून कौतुक झालं आहे. यानंतर विराटने शमीच्या आईसह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह फोटोही काढले आणि किंगचे चाहते हे क्षण व्हायरल करण्यासाठी सज्ज झाले.

शमीसाठी विजयी दिवस मोठा

मोहम्मद शमीच्या आईनेही विराट कोहलीची भेट घेतली. आई आणि मुलगा शमी या दोघांसाठीही हा मोठा दिवस होता कारण याआधी शमी कधीही आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा भाग नव्हता. शमी यावेळी आयसीसी चॅम्पियन ट्राॅफी जिंकणाऱ्या संघाचा पहिल्यांदाच भाग बनला आहे.

मोहम्मद शमीविषयी सर्वकाही...

  • मोहम्मद शमीचा जन्म 9 मार्च 1990 रोजी झाला. तो भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो.
  • शमी उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो आणि तो सुमारे 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो.
  • मोहम्मद शमी रिव्हर्स स्विंगमध्ये तज्ञ मानला जातो. त्याने जानेवारी 2013 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • मोहम्मद शमीने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि 5 विकेट घेतल्या.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द क्रिकेट कारकीर्द

  • शमीने जानेवारी 2013 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच सामन्यात चार षटके मेडन्स केली.
  • मोहम्मद शमीने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि 5 विकेट घेतल्या.
  • शमीने 2019 विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद 30 विकेट्स पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याने अवघ्या 10 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
  • मोहम्मद शमीने भारतीय संघासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेतले. शमीने रविचंद्रन अश्विनपेक्षा कमी चेंडू टाकून 200 बळी घेतले.
  • शमीने 9896 चेंडूत 200 बळी पूर्ण केले, तर अश्विनने 10248 चेंडू टाकले. या यादीत महान अष्टपैलू कपिल देव 11066 चेंडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे.
  • मोहम्मद शमीला त्याच्या कसोटी कारकिर्दीत 200 बळी पूर्ण करण्यासाठी केवळ 55 कसोटी सामने लागले.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+