Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Champions Trophy 2025 : पाकचा जळफळाट! भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला दिल्या 3 वेदना

Champions Trophy 2025 India gave a three pains : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयाने भारतात दिवाळी साजरी झाली. भारताच्या विजयात टीमच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. या विजयाने देशवासीय खूश असले तरीही पाकिस्तानचा जळफळाट झाला नाही असे होणार नाही.

कारण चॅम्पियन ट्राॅफीआधी आयोजनावरुन झालेला वाद असो की, भारत - पाकिस्तान मॅचवेळी पाकिस्तानी आजी-माजी क्रिकेटपटूंनी केलेले टीमइंडियाविरोधातील वक्तव्य असो.. यातून भारताने चॅम्पियन ट्राॅफी जिंकत टीम इंडियाच क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे ही पाकिस्तानला चोख चपराक दिली आहे तर पाकिस्तानी आजी-माजी क्रिकेटपटूंनाही ठोस प्रत्युत्तर दिले आहे.

Champions Trophy 2025

पाकिस्तानची केली बोलती बंद

मागील चॅम्पियन ट्राॅफी जिंकण्यात भारताला यश आले नाही, मात्र यावेळी त्यांना विजेतेपद पटकावण्यात यश आले. या विजयाने भारताने एकाचवेळी न्युझीलंड आणि पाकिस्तान यांची बोलती बंद केली. चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला तीन वेदना दिल्या. जाणून घेऊ कोणत्या त्या तीन वेदना आहेत..

1. पाकिस्तानकडून चॅम्पियन ट्राॅफी हिसकावली

याआधीची चॅम्पियन ट्राॅफी पाकिस्तानने जिंकली होती. मात्र यंदा 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने गतविजेता म्हणून प्रवेश केला होता पण यंदा त्यांना ट्राॅफीची दुसरी फेरीही गाठता आली नाही आणि गतविजेत्यांकडून ट्राॅफी टीम इंडियाने हिसकावून घेतली. सांगायचे म्हणजे पाकिस्तानला उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही आणि आता भारताने अंतिम फेरीत विजय मिळवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. 2017 मध्ये पाकिस्तान संघाने भारताला अंतिम फेरीत पराभूत केले होते पण आता भारताने अंतिम फेरीत विजय मिळवून चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब पटकावला आहे.

2. भारताने पाकिस्तानला दाखवला घरचा रस्ता

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा मानहानीजनक पराभव केला. पाकिस्तानचा संघ दुबईला आला आणि भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला. या सामन्याआधी पाकिस्तानी माजी खेळाडूंची भारतीय संघाविरोधी पोपटपंची सुरु होती, मात्र विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आणि सामना भारताकडे खेचून आणला. या पराभवानंतरच पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला.

3. पाकिस्तानचे पूर्ण यजमानपद हिसकावले

चॅम्पियन ट्राॅफीचे सर्व सामने पाकिस्तानात होतील यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आग्रही होता पण बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी घरच्या मैदानावर आयोजित करण्यावर पाकिस्तान ठाम होता. पण बीसीसीआयने पाकिस्तानात सामने खेळण्यास नकार दिला त्यामुळे बीसीसीआय समोर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नमते घ्यावे लागले. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेल अंतर्गत करण्यात आले होते. टीम इंडियाने आपले सर्व सामने दुबईत खेळले आणि शेवटी चॅम्पियन बनले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+