IPL 2025 : दिल्ली आणि पंजाब किंग्जचा चालू सामना रद्द! भारत पाकिस्तान संघर्षाचे कारण
आयपीएल २०२५ चा ५८ वा सामना आज धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात होता. पण हा सामना मध्येच रद्द करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १०.१ षटकांत १२२ धावा केल्या आणि १ विकेट गमावली. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान धर्मशाळेत ब्लॅकआउट लागू करण्यात आला. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले.

पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे धर्मशाळेतही ब्लॅकआउट लागू करण्यात आला. त्यामुळे सामना रद्द करावा लागला आणि स्टेडियम देखील रिकामे करण्यात आले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
#WATCH | Dharamshala: Sudhir, a cricket fan says, "The match has been called off because of security reasons. What do we have to be afraid of? We are in our country. If anyone, it should be Pakistan who should be afraid. Bharat Mata ki Jai." https://t.co/N3YDWolW07 pic.twitter.com/QjiNCQn9sZ
— ANI (@ANI) May 8, 2025
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. पंजाबने फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आहे, २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने त्यांचा पराभव केला होता. दुसरीकडे, दिल्लीने २०२० च्या आयपीएल हंगामाच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता,जिथे त्यांना मुंबई इंडियन्स (एमआय) ने पराभूत केले होते.
सामना थांबला तेव्हा किती होता स्कोअर
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरु असतानाच पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरु होते. त्यादरम्यान आयपीएल मॅचवरही हल्ल्याचे सावट पाहता अचानक सामना रद्द करण्यात आला. सामना सुरु होता त्यावेळी पंजाबने दहा ओव्हर आणि एका चेंडूत एक गडी गमावून १२२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने हल्ला केला त्यावेळी शहरात ब्लॅकाआऊट अर्थात वीजपुरवठा खंडीत करने भाग होते. यामुळे हा सामना थांबवावा लागला.
एनआयनेही यासंदर्भात वृत्त दिले आहे, धर्मशाळा येथे सामना रद्द करत प्रेक्षकांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी सुधीर नावाचा एक क्रिकेट चाहत्याची प्रतिक्रीया समोर आली. तो म्हणाला, "सुरक्षेच्या कारणास्तव सामना रद्द करण्यात आला आहे. आपल्याला कशाची भीती वाटते? आपण आपल्या देशात आहोत. जर कोणी असेल तर तो पाकिस्तान असेल ज्याला भीती वाटली पाहिजे. भारत माता की जय." असे तो म्हणाला पण ही त्याची भावना होती. नागरी सुरक्षा महत्वाचीच आहे असेही काही प्रेक्षकांनी सांगितले.
हेही वाचा : आताची सर्वात मोठी बातमी! भारताने पाकिस्तानचे F-16 फायटर जेट पाडले! संघर्षाला तोंड फुटले!
हेही वाचा : भारत- पाकिस्तान युद्ध झाल्यास देशातील या राज्यांना धोका! मुंबई, पुण्याला किती असेल धोका? जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications