Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर पलटवार; लाहोर, सियालकोटमध्ये हल्ले, पेशावरमध्ये झाला स्फोट!

India Pak War India shoots down Pakistan's F-16 fighter jet : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत- पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढतानाचे चित्र आहे. आताच आलेल्या बातमीनुसार, भारताच्या S-400 ने पाकिस्तानचे आठ मिसाईल नष्ट केली होती, त्यानंतर आता भारतीय सेनेने पाकिस्तानचे फायटर F-16 हे जेट पाडले आहे.

दरम्यान आणखी एक मोठी घडामोड आता समोर येत असून भारताने पाकिस्तानातील थेट लाहोर, सियालकोटवर हल्ला केला आहे. भारतीय विमाने हवेत तैनात करण्यात आले आहेत. इस्लामाबादही टार्गेटवर असल्याचे म्हटले जात आहे. तर पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर काश्मीर पुर्णपणे अंधारात ठेवण्यात आले असून तेथील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर अमृतसर आणि आजुबाजूच्या शहरामध्येही ब्लॅकआऊट ठेवण्यात आला आहे. तर आताच आलेल्या बातम्यानुसार पेशावरमध्ये स्फोट झाला असून तो कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

India Pak War India shoots down Pakistan s F-16 fighter jet

पाकिस्तानने जम्मूतील एअरस्ट्रीपवर हल्ला केल्यानंतर भारतीय वायूदलाच्या प्रणालीने तो यशस्वी परतावला. यानंतर भारताच्या S-400 ने पाकिस्तानचे आठ मिसाईल नष्ट केली होती, त्यानंतर आता भारतीय सेनेने पाकिस्तानचे फायटर F-16 हे जेट पाडले आहे. भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यालाही चोख प्रत्युत्तर देत ते नष्ट केले आहे.

पाकिस्तानने सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये 8 क्षेपणास्त्रे डागली, ती सर्व भारतीय हवाई संरक्षण युनिट्सनी रोखली असे वृत्तही एनआयने संरक्षण सूत्राच्या हवाल्यानुसार दिले आहे.

पाकिस्तानने जम्मू ते जैसलमेरपर्यंत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले आहेत. भारतीय हवाई संरक्षण प्रणाली सुदर्शनने हे हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानचे जवळपास आठ ड्रोन वायूदलाच्या प्रणालीने पाडले आहेत. यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे भारतातील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पाकिस्तानचे सर्वात प्रगत फायटर जेट F-16 पाडले

भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे सर्वात प्रगत विमान F-16 पाडल्याचे वृत्त एनडीटीव्हीनेही संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचे सर्वात प्रगत लढाऊ विमान एफ-16 हे आहे आणि ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे पाडण्यात आले आहे. भारतीय सैन्याने बुधवारी दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने जेएफ - 17 पाडली. लष्कराने या दोन्ही वृत्ताना दुजोरा दिलेला नाही परंतु लष्कराशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी याची निश्चिती केली आहे.

लष्कराने पाकिस्तानची 8 क्षेपणास्त्रे पाडली

संरक्षण सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानने सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये 8 क्षेपणास्त्रे डागली, ती सर्व भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडली. यादरम्यान उधमपूरमध्ये संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे आणि लोकांना त्यांच्या घरी जाण्याचे आवाहन केले जात आहे.

लाहोर, इस्लामाबाद टार्गेटवर!

पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताकडून पाकिस्तानच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आता लाहोर आणि इस्लामाबाद भारताच्या टार्गेटवर असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

पाकिस्तानकडून हल्ले सुरु झाल्यानंतर हल्ल्यांदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत नेमके काय झाले हे अधिकृतरित्या समजले नाही.

हेही वाचा : सर्वात मोठी बातमी ! जैसलमेर, जम्मूसह काही ठिकाणी पाककडून हल्ला

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+