Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत- पाकिस्तान युद्ध झाल्यास देशातील या राज्यांना धोका! मुंबई, पुण्याला किती असेल धोका? जाणून घ्या

India-Pakistan war : पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी 7 मे 2025 रोजी पाकिस्तानच्या संसदेत भाषण करत भारताविरुद्ध बदल्याची भाषा केली आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ अशी धमकीही त्यांनी दिली तसेच पाकिस्तानी सैन्यांना पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुर्ण मोकळीक दिली आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते असे अंदाज लावले जात आहे.

India-Pakistan war

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रायोजित दहशदवाद्यांना धडा शिकवावा ही समस्त भारतीयांची मागणी होती आणि तशी इच्छाही व्यक्त होत होती. पहलगाममध्ये भारतीय पुरुषांचाच दहशतवाद्यांनी बळी घेतला आणि महिलांचे कुंकू पुसले. त्यामुळे भारतानेही दहशतवाद्यांविरोधीतील मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने मोहिमच आखली. यामुळे आता जर भारत आणि दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारतातील कोणत्या शहरांना धोका पोहचू शकतो याचा अंदाज बांधला जात आहे. मुंबईला धोक्याची शक्यता तुलनेत कमीच असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

Take a Poll

देशातील कोणत्या शहरांना असेल धोका?

  • भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास खासकरुन भारत पाक सीमेवरील शहरांना जास्त धोका पोहचू शकतो.
  • पाकिस्तानच्या सीमेपासून पंजाब, जम्मू काश्मीर, गुजरात आणि राजस्थान हे भारतातील राज्य जवळ आहेत.
  • पाकिस्तानातून हवाई हल्ला झाला तर वरील या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो.

महाराष्ट्राला किती धोका? (India-Pakistan war)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास अनेकांना वाटते की, महाराष्ट्राला किती धोका होऊ शकतो. तर आम्ही सांगतो की, महाराष्ट्राची पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे त्यामुळे पाकिस्तानची थेट सीमा लागून नाही. त्यामुळे हवाई हल्ला झाल्यास मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही शहरांना धोक्याची शक्यता तुलनेत कमी आहे.

पाकिस्तानचा आणि महाराष्ट्राचा फक्त समुद्रीमार्गानेच संपर्क होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्राला पर्यायाने मुंबईला समुद्री मार्गाचाच धोका असू शकतो पण भारताच्या भक्कम नौदलापूढे पाकिस्तानचे नौदल फारच दुबळे आहे त्यांना तुर्कस्थानची मदत घ्यावी लागते अशा स्थितीत मुंबई, पुणे आणि अन्य शहरांना धोक्याची शक्यता तुलनेत कमी आहे.

हेही वाचा : Pakistan News : पाकच्या पतंप्रधानांच्या उलट्या बोंबा! भारताविरुद्ध बदल्याची भाषा, काय गरळ ओकली? वाचा

हेही वाचा : Who is Hafiz Saeed : कोण आहे भारताचा दुष्मन हाफिज सईद? आता आला बिष्णोई गँंगच्या रडारवर!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+