Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pakistan News : पाकच्या पतंप्रधानांच्या उलट्या बोंबा! भारताविरुद्ध बदल्याची भाषा, काय गरळ ओकली? वाचा

Operation Sindoor : पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी काल पाकिस्तानच्या संसदेत भाषण करत भारताविरुद्ध गरळ ओकली. त्यांनी बदल्याची भाषा तर केलीच पण जिथे हल्ला झाला त्या पहलगामला स्वतंत्र काश्मीरचा भाग म्हणाले. एवढेच नाही तर रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ अशी पोकळ धमकीही त्यांनी दिली.

पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीरलगतच्या प्रदेशात भारताने हवाई हल्ला केला. ऑपरेश सिंदुरद्वारे भारताने पाकिस्तानच्या नागरी वसाहतींची सुरक्षितता लक्षात घेऊन फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि ठिकाणांना लक्ष्य केले. हे अड्डे नेस्तनाबूत केल्यानंतर भारताच्या महिला शक्तीने पत्रकार परिषद घेत मोहिमेची माहिती दिली.

Operation Sindoor Pakistani PM Shahbaz Sharif s revenge language

यानंतर पाकिस्तानच्या संसदेत गदारोळ तर माजला पण एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे सत्ताधारी आणि विरोधकांन गळ्यात गळे घातल्याचे काल दिसले. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज खान यांनी आपले लांबलचक भाषण केले त्यात त्यांनी पाकिस्तानने भारताला धडा शिकवला अशा उलट्या बोंबा ठोकल्या.

काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान जरा एकदा वाचाच..

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज खान यांनी कथानक रचले की, आम्ही वाटच पाहून होतो आम्हाला जाणीव होती की, भारताची विमाने कधीही हल्ला करतील, आमचे सैनिक डोळ्यात तेल टाकून बसले होते. जेव्हा भारतीय विमाने आपच्या दिशेने आली तेव्हा आम्ही असे काही केले की, ती परत भारतात परतली.

Take a Poll

दुसरे कथानक पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रचले की, भारताने काय ते राफेल विमानं खरेदी केली तेव्हापासून खूप गाजावाजा ते करत आहेत पण हेच राफेल जेव्हा पाकिस्तानवर हल्ल्यासाठी आली तेव्हा आम्ही यातील तीन विमानांना पाडले.

..म्हणे आम्ही हवाई हल्ल्याला तोंड दिले

एकीकडे भारताने केवळ दहशतवाद्यांची ठिकाणे उद्धवस्त केली तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कथानक रचले आणि म्हणाले की, आमचे निष्पाप नागरिक मारले गेले. तरीही पाकिस्तानी लष्कराला दाद द्यावी लागेल आणि सलाम करावा लागेल की, त्यांनी भारतीय हवाई हल्ल्याला समर्थपणे तोंड दिले.

दहशतवाद्यांवरील हल्ल्यातील मृतांना शहीद म्हणाले..

भारताने मुळातः पाकिस्तानी दहशतवाद्यांची तळं उद्धवस्त केली आणि दहशतवाद्यांना लक्ष्य केले पण शहबाज शरीफ यांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीद असे संबोधले.

रक्ताचा थेंब, किंमत मोजा- भारताला धमकावले..

शहाबा शरीफ यांनी म्हटले की, पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारताने आम्हाला उगाचच घाईघाईने लक्ष्य केले कारण आमचा त्यात काहीही सहभाग नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची चौकशी व्हावी यासाठी आम्हीच पुढाकार घेत होतो पण आमची ऑफर भारताने स्वीकारली नाही. आम्ही आमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ. पाकिस्तानी सैन्य चोवीस तास दक्ष आहे असेही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+