Who is Hafiz Saeed : कोण आहे भारताचा दुष्मन हाफिज सईद? आता आला बिष्णोई गँंगच्या रडारवर!
Who is Hafiz Saeed : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिक आणि 193 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड जमाद उद दावा आणि लष्कर ए तोएबाचा संस्थापक म्होरक्या हाफिज सईद हा आहे. त्याच्यामुळे मुंबईत घडला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा आणि त्याच्या दहशतवादी गटांचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता त्याला बिष्णोई गँगच्या नावाने ठार मारण्याची धमकी आली आहे. यासंबंधीची पोस्ट व्हायरल होत असून त्यात त्याचा फोटो असून त्यावर लाल शाईने फुलीचे चिन्ह आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा कट रचून भारताविरुद्ध युद्ध पुकारणे असा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या 'दहशतवादासाठी जबाबदार' लोकांच्या यादीत हाफिज सईदचे नाव आहे. भारताचा दुष्मन हाफिज सईद हा दहशतवादी कोण आहे हे जाणून घेऊया.
हेही वाचा : 26/11मुंबई हल्ल्याच्या आठवणी! अजूनही अंगावर शहारे; कुठे आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद?
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्म
हाफिज सईदचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील सरगोधा येथे झाला. हाफिज सईदचे अरबी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातून शिक्षण झाले आहे. लष्कर ए तोएबा ही एक कथित कट्टरपंथी इस्लामिक संघटना आहे, ज्याचे उद्दिष्ट भारत आणि पाकिस्तानच्या काही भागात इस्लामिक राज्य स्थापित करणे आहे.
हाफिज सईदच्या या संघटनेवरही बंदी
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले. 2002 मध्ये पाकिस्तान सरकारनेही लष्करवर बंदी घातली. त्यानंतर हाफिज सईदने लष्कर-ए-तोयबाचा नवीन जमात-उद-दावा विभाग स्थापन केला पण हाफिज सईद जमात-उद-दावाचा लष्कर ए तोएबाशी शी कोणताही संबंध असल्याचे नाकारतो. मुंबई हल्ल्यानंतर जमात उद दावावरही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातली आहे.
कोण आहे हाफिस सईद?
- हाफिज मुहम्मद सईद याचा जन्म 10 मार्च 1950 साली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला आहे.
- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आणि प्रमुख आरोपी आहे.
- जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे.
- हाफिज सईद याला पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडून दिले आहे. सध्या तो ऐशोआरामीचे जीवन जगत आहे.
- हाफिस सईद याला कटकारस्थान रचणे आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपात भारतीय ट्रायल कोर्टाने दोषी धरले आहे.
- 2003, 2005 आणि 2008 मधील दहशतवादी हल्ल्यांत लष्कर-ए-तोयबाचा हात आहे.
- भारतीय संसदेवर जो हल्ला झाला तोही या गटाशी संबंधित आहे.
किती आहे हाफिज सईदवर बक्षीस
1 एप्रिल 2012 रोजी घोषित केल्यानुसार, हाफिज सईद याला पकडणाऱ्या किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिका सरकारने तब्बल 1 कोटी अमेरिकी डॉलरचे बक्षीस ठेवले होते.












Click it and Unblock the Notifications