IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार?
Champions Trophy 2025 IND vs AUS : भारताने चॅम्पियन ट्राॅफीत जोरदार कामगिरी करत आपल्या अपेक्षेप्रमाणे खेळ केला, या स्पर्धेत अद्याप एकही हार न पत्करता टीम इंडियाने विजयी पताका फडकावत पुढे मार्गक्रमण केले आहे, असे असले तरीही चॅम्पियन ट्राॅफी जिंकण्यासाठी दोन खडतर सामन्यात विजय भारताला मिळवणे आवश्यक आहे. आज त्यातील एक महत्वाचा उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज 4 मार्च 2025 रोजी होणार आहे. भारतीय संघाने अ गटातून पहिले स्थान मिळवून लीग टप्पा पूर्ण केला. ऑस्ट्रेलियन संघ ब गटात दुस-या स्थानावर राहिला, यामुळे ऑस्ट्रेलियाची भारताशी स्पर्धा होईल. पहिला उपांत्य सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. पाकिस्तानातील काही सामने पावसामुळे रद्द झाले. लीग टप्प्यातील हे सामने रद्द झाल्याने संघांचेही नुकसान झाले आहे.

उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय होईल?
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी खेळण्याच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. पाऊस पडल्यास काय करावे हे स्पष्ट केले आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळेल, हे देखील महत्त्वाचे आहे. IND विरुद्ध AUS उपांत्य फेरीतील सामन्यात पाऊस पडला तर.. पावसानंतरही सामना एकाच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसे न झाल्यास राखीव दिवशी पावसामुळे सामना जिथे थांबला होता तिथून सुरू केला जाईल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास, अंतिम फेरीत जाणारा संघ टेबलद्वारे निश्चित केला जाईल.
हेही वाचा : IND vs AUS: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमनेसामने; कोण जिंकणार
गुणतालिकेतनुसार, अंतिम फेरीत स्थान कसे ठरवतात?
गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळेल. बाद फेरीत निकाल मिळविण्यासाठी दुसऱ्या डावात खेळणाऱ्या संघाला 25 षटके खेळावी लागणार आहेत. दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. लाहोरमधील या सामन्यात पाऊस पडू शकतो.
राखीव दिवशी पाऊस पडला तर ट्रॉफी कोणाला मिळणार?
उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अंतिम सामन्यात राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना खेळता आला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हा प्रकार घडला होता.
हेही वाचा : IND vs AUS : सेमिफायनलमध्ये कोण जिंकेल? काय सांगते खेळपट्टी? कसा आहे सामन्यांचा इतिहास?












Click it and Unblock the Notifications