IND vs AUS : सेमिफायनलमध्ये कोण जिंकेल? काय सांगते खेळपट्टी? कसा आहे सामन्यांचा इतिहास?
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ ची पहिली सेमिफायनल उद्या खेळविली जाणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात उद्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. हा सामना खूप रोमांचक असणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या धोकादायक संघाला उपांत्य फेरीत हरवणे भारतासाठी सोपे नसेल. अशा परिस्थितीत, या सामन्यापूर्वी दुबईच्या खेळपट्टीची स्थिती जाणून घेऊयात...

काय सांगते दुबईची खेळपट्टी?
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी आतापर्यंत खूपच संथ असल्याचा अनुभव आलेला आहे. या खेळपट्टीवर चेंडू थांबत असून फलंदाजांना लांब फटके मारण्यात अडचण येत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनाही चांगले वळण मिळाले. भारताकडे फिरकी गोलंदाजांची मोठी फळी आहे. या फळीचा सामना ऑस्ट्रेलियाला करणे अवघड जाईल. असे सांगितले जात आहे.
काय आहे खेळपट्टीचा इतिहास?
दुबईमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये कोणत्याही संघाला २५० चा टप्पा गाठता आलेला नाही. बांगलादेशने भारताला २२९ धावांचे लक्ष्य दिले होते. तर पाकिस्तानने २४२ धावांचे लक्ष्य दिले होते. रविवारी भारताने न्यूझीलंडसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने तिन्ही सामने सहज जिंकले आहेत. त्यामुळे २५० ही धावसंख्या दोन्ही संघांसाठी महत्त्वाची राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
कसे आहे समोरासमोर रेकाँर्ड?
ऑस्ट्रेलिया आणि भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत. तर एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. एक सामना अनिर्णीत राहिला होता. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, दोन्ही देशांनी आतापर्यंत १५१ सामने खेळले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले आहेत. तर भारताने ५७ सामने जिंकता आले आहेत. १० सामने रद्द करण्यात झाले होते. त्यामुळे उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना नक्की रंगेल असे दिसते.












Click it and Unblock the Notifications