मोठी बातमी! रेल्वे पुलाखालील खड्ड्यात 4 शालेय मुलांचा बुडून मृत्यू! नाशिकमध्येही वाडा कोसळून 9 जखमी
Yavatmal News : राज्यात पावसाने कहर केला असतानाच नाशिक आणि यवतमाळ येथे दोन दुर्घटना घडल्या आहेत, यवतमाळच्या दारव्हा येथे पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर नाशिकमध्ये एक वाडा कोसळून नऊ जण जखमी झाले आहेत.
यवतमाळच्या दारव्हा शहरात रेल्वे उडान पुलासाठी खोदलेल्या खड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. दहा ते चौदा वर्षे वयोगटातील ही मुले असून बुधवारी २० ऑगस्टला ही दुर्घटना घडली. रेल्वे स्टेशन परिसरात हा निर्माणाधीन पूल असून, पिलरसाठी मोठा खड्डा खणलेला आहे, पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते.त्यात बुडून या मुलांचा मृत्यू झाला.

सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, रिहान असलम खान, गोलु पांडुरंग नारनवरे, सोम्या सतीश खडसन, वैभव आशीष बोथले (१४) ही मुले बुडाली. यानंतर काही नागरिकांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मुलांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर दारव्हा परिसरात हळहळ व्यक्त झाली.
नाशिकमधील वाडा कोसळला- नऊ जण जखमी
जुन्या नाशिकमध्ये पावसामुळे काल २० ऑगस्टला रात्री एका जुना वाडा कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत. यात आठ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक शहरातील जुने नाशिक गावठाणात मोठ्या प्रमाणात जुने वाडे दाखल आहेत. त्यातील त्र्यंबक नाका पोलिस चौकी जवळील तीन मजली जुना वाडा कोसळला.
दरम्यान, वाडा कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीकांनी अडकलेल्या रहीवाशांना बाहेर काढले तसेच महापालिकेचे अग्नीशमन दलाचे पथक दाखल झाले. या सर्व जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जुन्या नाशकात पावसामुळे अनेक जुनी घरे म्हणजेच वाडे धोकादायक स्थितीत असून नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात का पडतोय मुसळधार पाऊस? 'या' कारणांमुळे वाढला पावसाचा जोर.. आता कधी ओसरणार? वाचा सविस्तर
हेही वाचा : Maharashtra Rain राज्यात पावसाचा मोठा दिलासा; पण या भागात जोरदार पाऊस होणार! 8 जिल्ह्याना येलो अलर्ट












Click it and Unblock the Notifications