Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात का पडतोय मुसळधार पाऊस? 'या' कारणांमुळे वाढला पावसाचा जोर.. आता कधी ओसरणार? वाचा सविस्तर

Why is it raining heavily in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. विशेषतः १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यानुसार आज २० ऑगस्टपर्यंत पावसाचा अनुमान अगदी तंतोतंत होता.

Why is it raining heavily in Maharashtra

वाढलेल्या पावसाची प्रमुख कारणे काय?

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र : सध्या पश्चिम मध्य आणि त्याला लागून असलेल्या वायव्य बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९.६ किलोमीटरपर्यंत वाढले आहे. गेल्या १२ तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकून दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचले. यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत आर्द्रता वाढून पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले.

Take a Poll

मान्सूनचा ट्रफ : मान्सूनचा ट्रफ नलिया, जळगाव, ब्रह्मपुरी, जगदलपूरमधून गेला. हा ट्रफ समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर होता व त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर दिसून आला आहे.

अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती : उत्तरपूर्व अरबी समुद्र आणि गुजरातच्या जवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याच सोबत, १९° उत्तर अक्षांशावर एक कमान क्षेत्र (Arc Zone) आहे जे ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडे झुकले आहे. या दोन्ही घटकांमुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.

ऑफशोअर ट्रफ : दक्षिण कोकणापासून उत्तर केरळपर्यंत समुद्रसपाटीवर एक ऑफशोअर ट्रफ (Offshore Trough) सक्रिय झाला आहे. या ट्रफच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

वरील हवामान प्रणालींच्या एकत्रित परिणामांमुळे १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. यातही विशेषतः मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कधी ओसरणार पावसाचा जोर?

मध्य भारतावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगर आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र, आता राज्यातील बहुतांश भागांत २० ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई आणि कोकण: १९ ऑगस्टच्या तुलनेत २० ऑगस्ट रोजी मुंबई शहरासह महानगर परिसरात पावसाचे प्रमाण कमी होईल. दुपारपर्यंत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर आणखी ओसरेल. कोकण पट्ट्यातही पावसाचे प्रमाण कमी होईल, पण काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहू शकतो.

पालघर आणि नाशिक: २० ऑगस्टला सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

मध्य महाराष्ट्र: मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, मात्र काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता कायम राहील.

इतर भाग: राज्याच्या बहुतांश भागांमध्ये २० ऑगस्टपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरणार आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

हेही वाचा : Maharashtra Rain राज्यात पावसाचा मोठा दिलासा; पण या भागात जोरदार पाऊस होणार! 8 जिल्ह्याना येलो अलर्ट

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+