अजित दादांचा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का? झिरवाळ यांच्या विधानाने शक्यतेला बळ!
Will Sharad Pawar and Ajit Pawar's NCP Merge Narhari Zirwal's Statement : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच, आता राजकीय पुनर्गठनाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या एका सूचक विधानाने "काका आणि पुतण्यांचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का?" असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अजित दादांच्या जाण्यानंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला सावरण्यासाठी आता शरद पवारांनीच पुढाकार घ्यावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
"दोन्ही पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आहे, ते आतूनही एक आहे ते विभक्त राहू शकत नाही, अशी भावना एबीपी माझाशी बोलताना काही महिलांनी दिल्या. तर जनभावनाही हीच असल्याचे सध्याच्या स्थितीवरुन दिसून येत आहे.

काय म्हणाले नरहरी झिरवाळ?
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ भावूक झाले होते. त्यांनी म्हटले की, "दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आलेच आहे तर ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक भक्कम स्थान असेल. जनतेच्या मनातही दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे अशीच इच्छा आहे. आता अजित दादा आपल्यात नाहीत, अशा वेळी कुटुंबाने आणि पक्षाने एकत्र येणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."
झिरवाळ यांच्या या विधानामुळे अजित पवार गटातील अनेक आमदार आणि नेते पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची तीन प्रमुख कारणे
१. नेतृत्वाची पोकळी
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटात सध्या तरी त्यांच्या तोडीचा 'मास लीडर' दिसत नाही. त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी शरद पवारांच्या छत्रछायेखाली जाणे हाच पर्याय अनेकांना सोयीचा वाटत आहे.
२. कार्यकर्त्यांची भावना
"एकच वादा, अजित दादा" अशा घोषणा देणारा कार्यकर्ता आता संभ्रमात आहे. पवार कुटुंबातील वाद आता मिटावा आणि सर्वांनी एकत्र यावे, अशी साद सामान्य कार्यकर्ता घालत आहे.
३. नरहरी झिरवाळ यांचे मत
झिरवाळ हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही जवळचे मानले जातात. त्यांनी उघडपणे एकत्रीकरणाची भाषा केल्यामुळे या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या मतानुसार, शरद पवार आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे, मनपा निवडणुकीतही एकत्र आला असल्याचे म्हणत त्यांनी या गोष्टीला बळ दिले आहे.
शरद पवारांची भूमिका काय असेल?
अजित पवारांच्या जाण्याने शरद पवार वैयक्तिकरित्या खचलेले दिसत असले तरी, राजकीयदृष्ट्या ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी अंत्यविधीवेळी ज्या प्रकारे अजित दादांच्या मुलांचे आणि पत्नीचे सांत्वन केले, त्यातून पवार कुटुंब किमान कौटुंबिक पातळीवर तरी एक झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : महाराष्ट्र हळहळला! डबडबल्या डोळ्यांनी अजित पवारांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
हेही वाचा : अजित दादांच्या अपघाताचा 'तो' 60 सेकंदाचा घटनाक्रम! वाहतूक मंत्रालयाने सांगितलेली भीषणता 10 मुद्द्यात












Click it and Unblock the Notifications