Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित दादांच्या अपघाताचा 'तो' 60 सेकंदाचा घटनाक्रम! वाहतूक मंत्रालयाने सांगितलेली भीषणता 10 मुद्द्यात

Ajit Pawar plane Crash Ministry of Civil Aviation Explains the Accident : "धावपट्टी दिसत नाहीये..." हे वैमानिकाचे शब्द आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच झालेला भीषण स्फोट! नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्या बारामतीने अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च उंचीवर नेलं, त्याच बारामतीच्या भूमीवर उतरताना एका महानायकाचा 'आकाशातच' अंत झाला. लँडिंगच्या त्या दोन प्रयत्नांमध्ये नक्की काय घडलं? एटीसीचा संपर्क कधी तुटला आणि शेवटच्या क्षणी वैमानिकाने दिलेला 'तो' संदेश का अपूर्ण राहिला? नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या धक्कादायक १० मुद्द्यांमधून आता या मृत्यूतांडवाचा थरार समोर आला आहे.

Ajit Pawar plane Crash

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने देश हादरला असतानाच, आता या भीषण अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्राथमिक माहिती दिली आहे. 'वनइंडिया हिंदी' नुसार, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी बारामतीमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अपघाताच्या तपासाचे आदेश दिले आहेत. लँडिंगच्या वेळी नक्की कोणती चूक झाली आणि एटीसीशी (ATC) संपर्क कसा तुटला, याचा १० महत्त्वाच्या मुद्द्यांत घेतलेला आढावा.

अपघाताचा घटनाक्रम: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे १० महत्त्वाचे मुद्दे

. लँडिंगचे दोन प्रयत्न: अजित पवार यांच्या विमानाने बारामती विमानतळावर उतरण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले. खराब हवामान आणि कमी दृश्यता (Visibility) हे सर्वात मोठे आव्हान होते.

२. पहिल्या प्रयत्नात अपयश: सकाळी ८:४३ च्या सुमारास पहिल्या प्रयत्नात वैमानिकाने एटीसीला कळवले की रनवे स्पष्ट दिसत नाहीये, त्यामुळे सुरक्षित लँडिंग शक्य नाही.

३. 'गो-अराउंड'चा आदेश: सुरक्षा लक्षात घेता एटीसीने विमानाला 'गो-अराउंड' (पुन्हा हवेत गिरकी घेऊन येण्याचा) आदेश दिला होता.

४. दुसऱ्या प्रयत्नात रनवे दिसला: दुसऱ्या प्रयत्नावेळी वैमानिकाने रनवे दिसत असल्याची पुष्टी एटीसीकडे केली, त्यानंतर लँडिंगची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

५. लँडिंगची औपचारिक परवानगी: वैमानिकाच्या माहितीनंतर एटीसीने विमान उतरवण्यास अधिकृत हिरवा कंदील दाखवला होता.

६. अचानक संपर्क तुटला: परवानगी मिळाल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमानाचा एटीसीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला.

७. 'रीड-बैक' न मिळणे ही मोठी शंका: वैमानिकाने एटीसीच्या सूचनांना परत प्रतिसाद (Read-back) दिला नाही. तांत्रिक भाषेत हे अत्यंत गंभीर मानले जाते, ज्याची आता सखोल चौकशी सुरू आहे.

८. AAIB आणि DGCA कडून तपास: एअरक्राफ्ट एक्सिडेंट इनवेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि DGCA ची पथके घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक बाजू तपासल्या जात आहेत.

९. ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू: विमानातील 'ब्लॅक बॉक्स' (CVR आणि FDR) शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातूनच शेवटच्या क्षणी विमानात काय घडले, हे स्पष्ट होईल.

१०. व्हीआयपी प्रोटोकॉलची चौकशी: खराब हवामान असतानाही विमानाला उड्डाणाची परवानगी कशी मिळाली? तसेच कोणत्याही व्हीआयपी प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले का, याचीही चौकशी केली जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+