Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रातले एक्झिट पोल कधी चुकले, कधी बरोबर आले..? पहा संपूर्ण माहिती

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला मतदान सुरु आहे. मतदान संपल्यावर सहा वाजेनंतर, विविध माध्यमांवर एक्झिट पोल सुरु होतील. सरकार कुणाचे येणार, मतदारांचा कौल कुणाला आहे, या प्रश्नांचे अंदाज त्यातून समजणार आहेत. परंतु भारतातील आणि महाराष्ट्रातील एक्झिट पोलचा इतिहास पहिल्यास, अनेक वेळा एक्झिट पोल हे फेल ठरल्याचे दिसले आहे. एक्झिट पोल यशस्वी का ठरत नाही? कोणत्या कारणांमुळे ते चुकतात? इतिहास काय सांगतो? हे सर्व आपण समजू घेऊयात...

Exit Poll

एक्झिट पोलचा इतिहास काय?

जगभरातील अनेक देशांमध्ये मतदानानंतर एक्झिट पोल केला जातो. एक्झिट पोलची सुरुवात अमेरिकेनं केली. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 1936 मध्ये सर्वात प्रथम जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रेबिंसन यांनी निवडणूक सर्व्हे केला होता. त्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी फ्रँकविल डी रुजवेल्ट यांचा विजय होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. प्रत्यक्षात निकालही तसाच आला. अमेरिकेपासून सुरु झालेला एक्झिट पोल भारतात येण्यास अनेक वर्ष लागली. 1996 मध्ये सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीजने (सीएसडीएस) एक्झिट पोल केला. त्यावेळी प्रसिद्ध पत्रकार नलिनी सिंह यांनी दूरदर्शनसाठी एक्झिट पोल केला होता. त्या पोलमध्ये भाजप लोकसभा निवडणूक जिंकणार असा निष्कर्ष काढला गेला आणि प्रत्यक्षात भाजपचे सरकार आले. 1998 मध्ये खासगी वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल करण्यास सुरुवात केली. देशातील प्रमुख संस्था सी-व्होटर, चाणक्य, एक्सिस माय इंडिया, पोल स्ट्रॅट आणि जन की बात यासारख्या संस्था एक्झिट पोल करतात.

एक्झिट पोल फेल कधी ठरले?

2004 मध्ये यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सगळ्याच एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येण्याचा पोल दिला होता. परंतु एनडीएला 200 जागांवरही विजय मिळवता आला नाही. 222 जागा मिळवणाऱ्या युपीएने समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाला सोबत घेऊन सरकार बनवले होते. 2009 मध्येही लोकसभेलाही जवळपास सर्वच एक्झिट पोल फेल ठरले. त्यावेळी युपीएला 199 तर एनडीएला 197 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात युपीएला 162 तर एनडीएला 159 जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे सरकार आले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे आकडे निकालाशी वेगळे होते. परंतु एक्झिट पोलचा निष्कर्ष बरोबर आला. त्या निवडणुकीत भाजप सरकार येणार असल्याचा दावा एक्झिट पोलने केला होता. त्या निवडणुकीत भाजपला 282 तर एनडीएला 336 जागा मिळाल्या. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 100 जागा मिळणार असल्याचे दाखवण्यात आले. परंतु काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये भविष्यवाणी ठरली खरी

2019 मध्ये एक्झिट पोलची भविष्यवाणी खरी ठरली. या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात एनडीए सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. एनडीएला 353 जागा मिळाल्या. भाजपलाच 303 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला केवळ 91 जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसला मिळाले नाही. मात्र लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीत एक्झिट पोल फेल ठरले. या निवडणुकीत सर्वच एक्झिट पोलने भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा निष्कर्ष काढला होता. परंतु भाजपची घोडदौड 240 जागांवर थांबली. या निवडणुकीत भाजपला नव्हे तर एनडीएला बहुमत मिळाले. एनडीएला 293 जागा मिळाल्या.

विधानसभेतही पोल ठरले फेल

विधानसभा निवडणुकीतही एक्झिट पोल फेल ठरले आहे. गेल्यावेळी 2019 च्या विधानसभेला बहुतेक सर्व पोल्सने भाजपची सत्ता येईल असे सांगितले होते. मात्र भाजपच्या जास्त जागा येऊनही सत्ता महाविकास आघाडीने स्थापन केली. 2014 ला बहुतेक एक्झिट पोल बरोबर आले. मात्र 2004 आणि 2009 मध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला होता. लोकसभेलाही अनेकदा ते फेल ठरले होते.

एक्झिट पोल फेल ठरण्याची कारणे

एक्झिट पोलच्या निष्कर्षासाठी खूपच कमी वेळ असतो. त्यामुळे मोजक्या लोकांना प्रश्न विचारुन निष्कर्ष काढले जातात. एक्झिट पोलचा नियमानुसार एकूण मतदारापैकी एक टक्का मतदारांची पाहणी करावी लागते. त्यात लिंग आणि जातीकडे लक्ष ठेवले पाहिजे. परंतु त्या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे एक्झिट पोल फेल होतात. दुसरीकडे मतदान केल्यानंतर अनेक मतदार आपलं खरं मतदान लपवतात. त्यामुळे सर्व्हे करणाऱ्यांपर्यंत खोटी माहिती जाते. एक्झिट पोल करणारी संस्था डेमोग्रॉफी म्हणजे विविधता, सामाजिक सांस्कृतिक आणि अस्थिरता यावर लक्ष देत नाही. यामुळे एक्झिट पोल फेल ठरतात. ज्या मतदान केंद्रावर कोणत्याच पक्षाचे प्राबल्य नाही, तेथे एक्झिट पोल संस्था गेली तर किमान खरी माहिती समोर येते. मात्र असे अनेकदा होत नाही.

एक्झिट पोलवर बंदीचीही मागणी

एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे ठरत असल्यामुळे त्यावर बंदी आणावी, अशाही चर्चा अनेकदा होतात. लोकसभा 2024 च्या एक्झिट पोलनंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळली. एक्झिट पोलचा सर्वात मोठा परिणाम भारतातील शेअर बाजारावर होतो. शेअर बाजारात अनेकदा घसरतो मात्र त्यावर बंदी आणण्यापेक्षा त्यात सुधारणा करावी, अशीही एक चर्चा पुढे येते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+