विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितले

मुंबई : पुढील दोन ते तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतही जागावाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन्हींकडील नेत्यांच्या दिल्लीच्या वा-या वाढल्या असून. महाविकास आघाडी आणि महायुतीतील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल यावर देखील यावर जोरदार चर्चा रंगू लागल्या असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्टच सांगितले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार आणि आता निवडणुकीनंतर ठाकरे 2 सरकार येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.

Sanjay raut

महायुतीच्या लाडक्या उद्योगपतींना भूखंड वाटप

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सागितले की, मुंबई शहरातील एकूण 22 बहुमूल्य भूखंड महायुती सरकारकडून अदानी यांना दिले जात आहेत. हे सरकार तीन गँगचे सरकार आहे. पूर्वी लँड माफिया गुंडगिरी करत होते पण आता सरकारच्या लाडक्या उद्योगपतींनायांना भूखंड दिले जात आहेत. शिवसेना धारावी प्रकल्पाची एकही विट रुचू देणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

मतासांठीची लाडकी बहीण योजना होणार बंद

राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहेत पण सरकारकडून दिलेले हे पैसे त्यांच्या कोणाच्या खिशातील पैसे नाहीत. त्यामुळे लोकांनी त्या पैशांचा लाभ घ्यावा. परंतु मतांसाठी निर्माण केलेली ही योजना बंद होणार आहे. काही दिवसांत सरकारच्या या सर्व योजना बंद करण्यात येतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ठाकरे 2 सरकारच्या काळात नव्या स्वरुपात या योजना आणणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+