'तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही...'; जयंत पाटलांवरील टीकेनंतर गोपीचंद पडळकरांना यांनी दिला थेट इशारा!
Gopichand Padalkar controversy : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातील एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची आणि वादग्रस्त टीका केली.
या टीकेमध्ये त्यांनी जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून पडळकरांवर जोरदार टीका सुरू झाली. तर आता पडळकर यांचा निषेध व्यक्त केला जात आहे, अशातच, धनगर समाजातील बडे नेते यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. तू तर चड्डीच काढून घेतो, तू एवढा मोठा झालास का, असा इशारा त्यांनी दिलाय.
पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाळवा तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांनीच नव्हे, तर सामान्य लोकांनीही त्यांच्या भाषेचा निषेध केला.
या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीचंद पडळकरांना फोन करून त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये टाळण्याची सूचना दिली.
शिवाजी वाटेगावकर यांचा पडळकरांना इशारा
या वादग्रस्त वक्तव्यानंतर, बापू बिरू वाटेगावकर यांचे सुपुत्र शिवाजी वाटेगावकर यांनी गोपीचंद पडळकरांना थेट इशारा दिला आहे.
'जयंत पाटील हा तुला काही आलतू-फालतू माणूस वाटला का?' असा प्रश्न विचारत शिवाजी वाटेगावकर म्हणाले, "तू वाळवा तालुक्यात येऊन दाखव, तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो. तुला समाजात काडीचीही किंमत नाही."
ते पुढे म्हणाले की, "पडळकरांनी धनगर समाजाची मान खाली घालायला लावली. बापूंसारख्या मोठ्या व्यक्तींवर बोलण्याएवढा तू मोठा झालास का?"
शिवाजी वाटेगावकर यांनी अत्यंत कठोर शब्दांत पडळकरांवर टीका केली, "वाळवा तालुक्यात यायचा विचार कर, तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही."

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "गोपीचंद पडळकर यांनी केलेले विधान योग्य नाही, आणि आम्ही अशा वक्तव्यांचे समर्थन करत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या वडिलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल असे बोलणे चुकीचे आहे." त्यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः पडळकरांना फोन करून अशा वक्तव्यांबाबत समज दिली आहे. पडळकरांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची बाब मान्य केली. "फडणवीस यांनी मला अशा प्रकारची वक्तव्ये करू नका, अशी सूचना दिली आहे आणि मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन," असे पडळकर म्हणाले.
या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वैयक्तिक टीका आणि असभ्य भाषेचा वापर किती वाढला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतरही अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत असल्याने राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.












Click it and Unblock the Notifications