Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय सांगताय..? शरद पवारांनी चक्क मोदींचं अभिनंदन केलं; पहा नेमकं काय घडलं

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने काल (ता. 3 ऑक्टोंबर) मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. केंद्र सरकारने ती मागणी काल मान्य केली. आज सकाळीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत केंद्राचे याबाबत अभिनंदन केले. प्रत्येक मराठी माणसाचं मनापासून समाधान व्हावं, असंच कालचं वृत्त होतं, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

शरद पवार म्हणाले, मराठीचे महत्त्व वाढेल

पत्रकार परिषदेच शरद पवार यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, काल केंद्र सरकारने आसामी, पाली, मराठी आणि इतर दोन भाषांना अभिजात दर्जा दिला. या निर्णयामुळे या भाषांचं महत्त्व वाढेल. शरद पवारांनी आपल्या स्टाईलने अभिनंदन करताना सरकारचे कानही टोचले. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारची ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. जो निर्णय झाला तो खूप उशीरा झाला. जरी उशीर झाला तरी निर्णय झाला. त्याबद्दल केंद्र सरकारचं मी अभिनंदनच करतो.

Sharad Pawar on Pm modi

आरक्षणाबाबतही केलं महत्त्वाचं वक्तव्य

त्यापूर्वी आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येईल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षण मिळावे, ही लोकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+