संतोष देशमुखांचे डोळे जाळले नाही! कशी घडली हत्या; CM फडणवीसांनी सभागृहात सर्वच थरारच सांगितला!
Santosh Deshmukh Murder Case in Legislature CM Devendra Fadnavis told Timeline : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली. त्यांचे डोळे जाळले ही वस्तूस्थिती नाही, त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आले आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात CM देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सर्व थरारच सांगितला.
बीड जिल्ह्यातील वाळू माफिया, भू माफिया आणि खंडणीखोर यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा - मोक्का अंतर्गत कारवाईची मोहीम आखली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 6 डिसेंबर 2024 रोजी बाराच्या दरम्यान मसाजोग येथे अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले हे आरोपी त्या ठिकाणी गेले. त्यानंतर अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तेथील वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजीराव थोपटे यांनाही मारहाण केली.
हेही वाचा : सरपंच संतोष देशमुख प्रकरणी SPची बदली! 6 महिन्यात SIT चौकशी, कुटुंबियांना 10 लाखांची फडणवीसांकडून मदत
..म्हणून संतोष देशमुख मध्ये पडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले,मारहाण चालू असताना थोपटे यांनी तेथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना काॅल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. हे घुले बाजुच्या गावचे आहेत त्यामुळे बाजुच्या गावचे लोक मारहाण करतात म्हटल्यावर साहाजिकच संतोष अण्णा तिथे आले. त्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली. देशमुख यांच्यासोबत अनेक लोक आले. बाहेरुन येत दादागिरी करत असतील तर त्यांना धडा शिकवायला हवा अशा हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला. घुलेंच्या दादागिरी आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला.
हेही वाचा : संतोष देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अवयवांचा झाला पार चेंदामेंदा; हिवाळी अधिवेशनात पुन्हा गदारोळ
तारा गुंडाळून बेदम मारहाण
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 9 डिसेंबर 2024 ला संतोष अण्णा आपल्या वाहनातून गावी जात होते, त्यावेळी ते एकटेच होते. पंपावर ते थांबले तिथे त्यांचे आतेभाऊ होते ते त्यांना दिसले आणि अण्णांनी त्यांना बोलावले आणि सोबत चल म्हणाले. दोघे निघाले त्यावेळी टोलनाक्याजवळ काळ्या रंगाची स्काॅर्पिओ आणि इतर गाड्या वाट पाहत होत्या. त्यानंतर त्यांची गाडी वेगाने गेले तेव्हा वाट पाहणाऱ्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर अण्णांना बाहेर काढले आणि त्यांनी स्वतःच्या गाडीत टाकून मारहाण व नंतर अपहरण केले. तारा गुंडाळून मारहाण झाली. पाठीवर व्रणही दिसत आहेत. त्यावेळी असे लक्षात आले की, यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हल्लेखोर पळाले.
हेही वाचा : बीड, परभणीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, पहा मुख्यमंत्री फडणवीसांनी काय दिले उत्तर
..ते सोडतो-सोडतो म्हणत होते
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या दरम्यान अण्णांचा भाऊ विष्णू चाटेंच्या संपर्कात होता आणि त्यांनी भावाला सोडण्याची विनंती केली. हल्लेखोर सोडतो सोडतो म्हणत काही वेळही देत होते.अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू संतोष देशमुख यांचा झाला.
..म्हणून अॅट्राॅसिटी उशीरा दाखल केली
फडणवीसांनी स्पष्ट केले की, संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले नसून त्यावर प्रहार करण्यात आले आहेत. काही प्रश्न उपस्थित झाले की, अॅट्राॅसिटी उशीरा का दाखल झाली. यावर फडणवीसांनी काही मुद्दे सांगितले ते असे..
6 तारखेची जी फिर्याद आहे ती प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली आणि त्यात स्वतःला मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे अॅट्राॅसीटी झाली नाही. त्यानंतर अॅट्राॅसीटी लागू करण्यात आली आहे.
या गुन्ह्यापुर्वी काय घडलं होतं...
29 नोव्हेंबर 2024 ला केज ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यात सुनील शिंदे यांना वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेंच्या मोबाईलवरुन धमकी दिली. तसेच सुदर्शन घुलेने कार्यालयात येत धमकावले असेही तक्रारीत नमूद असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. वेळोवेळी प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही गुन्ह्यांचा संबंध काय याची चौकशी आपण करत आहोत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications