Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संतोष देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अवयवांचा झाला पार चेंदामेंदा; हिवाळी अधिवेशनात पुन्हा गदारोळ

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचे पडसाद आज पुन्हा उमटले. गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्टच आज वाचून दाखवला. संतोष देशमुखांना एवढ्या अमानवतेने मारहाण झाली की, बरगड्या, किडनी आणि लिव्हरचा पार चेंदामेंदा झाल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज करण्यात आली. या प्रकरणावरुन आज पुन्हा गदारोळ झाला.

Santosh Deshmukh murder case

आ. पंडीतांनी वाचला रिपोर्ट

आ. विजयसिंह पंडीत यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे पोस्टमोर्टम केलेल्या डाँक्टरांशी संपर्क साधल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर त्यांनी पोस्टमोर्टम रिपोर्टच सभागृहात वाचून दाखवला. ते म्हणाले, मी गावात गेल्यावर पोस्टमार्टम केलेल्या डाँक्टरांशी फोनवरुन संपर्क केला. तेव्हा देशमुख यांच्या बरगड्या, किडनी व लिव्हरचा पार चेंदामेंदा झाल्याचे डाँक्टरांनी मला सांगितले. देशमुख यांच्या शरीरावर सर्वत्र एवढा मार लागला होता की मुका मारामुळे अतिरक्तस्त्राव झाला होता. ते शाँकमध्ये गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे सगळे एवढे भयानक आहे की, आरोपींना फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही.

जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणतात

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण 'हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज' असे नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे. या प्रकरणांमध्ये केज पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो. केस पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. ज्यांनी चूक केली आहे त्या आरोपींना अटक होण्यासाठी निर्देश द्या, असं विजयसिंह पंडित म्हणाले. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच लावून धरल्याचं दिसलं.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+