Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बीड, परभणीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, पहा मुख्यमंत्री फडणवीसांनी काय दिले उत्तर

महाराष्ट्रातील वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनेचे आज विधानसभेच चांगलेच पडसाद उमटले. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी संरपंच संतोष देशमुख व परभणीतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळ्याची विटंबना हे दोन्ही मुद्दे आज विरोधकांनी लावून धरले. विरोधकांनी या मुद्यांवर सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis

विरोधी पक्षांनी मांडले मुद्दे

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असणाऱ्या तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व सर्व दोषींची चौकशी करावी अशी मागणी दानवे यांनी केली. या हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी दिली. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी केली.

फडणवीसांनी दिले उत्तर

या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बीडमध्ये, परभणी मधील घटना अतिशय गंभीर आहेत. बीडमध्ये तरुण सरपंचाची हत्या झाल्याचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. पीआयला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. इन्चार्ज पीएसआयला सस्पेंड केले आहे. तिघांना अटक केलीय. काही आरोपी फरार असले तरी त्यांना शोधून निश्चित अटक करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

परभणीच्या घटनेवरही केले भाष्य

परभणी येथील पुतळा विटंबनाप्रकरणीही फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, "बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत, यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+