pune bridge collapse : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला, नेमकं कारण काय, कशी घडली दुर्घटना
pune bridge collapse : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.15) घडली. या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळल्याने खाली नदीत कोसळून 25 ते 30 लोक वाहून गेल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सांगितले की, या दुर्घटनेत आतापर्यंत 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर बचावकार्य अतिशय वेगात सुरू आहे.
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील हा पूल नेमका कसा कोसळला, त्याचे नेमकं कारण काय, याविषयी देखील आता माहिती समोर येऊ लागली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नेमकी जबाबदारी कोणाची, नेमकं दोषी कोण होतं, याविषयी देखील विरोधकांकडून प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. यासर्व प्रश्नांची व ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याविषयी जाणून घेऊया...!
Why did the bridge on the Indrayani river collapse पूल का कोसळला?
मिळालेल्या माहितीनुसार, जीर्ण झालेल्या पुलावर गरजेपेक्षा जास्त लोक होते, असे स्थानिकांनी सांगितले आहे. हा पूल आधीच खूपच वाईट आणि जीर्ण अवस्थेत होता. अपघाताच्या वेळी पुलावर क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक होते आणि त्यावरून जड मोटारसायकलीही जात होत्या. पुलाच्या ढिगाऱ्यातून बचाव पथकाला एक दुचाकीही सापडली आहे. पुलावरून वाहने जात होती. काही लोक फोटो सेशल करत होते. आज सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमलेले होते. अतिभार झाल्याने अखेर हा पूल कोसळल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा : Pune News : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 5 जण ठार; 25 ते 30 लोक वाहून गेले, चिमुकल्यांचाही समावेश!
युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू
दुसरीकडे, या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य केले जात आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. अपघात झालेला हा पूल 2 महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. हा पूल अनेक दशके जुना असून त्याच्या जीर्ण अवस्थेमुळे तो बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाऊस सुरू झाला आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पुलावर जमा झाले होते. तसेच, आज रविवारचा दिवस असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
त्यासोबतच काही पर्यटकांनी या पुलावरून गाडी घातली. हा लोखंडी पूल अत्यंत जीर्ण झाला होता, इतके वजन एकाच वेळी पुलावर आल्याने त्यावर दाब निर्माण झाला आणि पूल कोसळला.
या दुर्घटनेत अनेकजण नदीत पडले आणि वाहून गेल्याची भीती आहे. पूल कोसळल्यानंतर काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नेमके काय घडले? ( How did the pune bridge collapse happen)
मावळमधील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंडमळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकव पूल हा जुना झालेला आहे. आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे.
तसेच, या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंड आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला. आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.
हे ही वाचा : कुंडमळा पूल दुर्घटनेवर देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय म्हणाले?, किती जणांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
अजित पवार म्हणाले- दोषींवर कारवाई करू!
या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत.
या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम देखील त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
तातडीने वैद्यकीय मदत केली जातेय!
पुढे बोलताना आजित पवार म्हणाले की, राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला प्रश्न?
दरम्यान, आता या अपघातावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी लिहिले की, "पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे.
ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे".
-
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल! -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग










Click it and Unblock the Notifications