कुंडमळा पूल दुर्घटनेवर देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय म्हणाले?, किती जणांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
Devendra Fadnavis and Ajit Pawar frist reaction On Kundmala Bridge Collapse : पुणे जिल्ह्यातील मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी दुपारी 3.30 मिनिटांच्या सुमारास घडली. पुल कोसळल्याने या पुलावर असलेले सुमारे 25-30 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये लहान चिमुकल्यांचा देखील समावेश असल्याचे सांगितले गेले.
दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या घटनेत आतापर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष घटनास्थळारील माहितीनंतर सर्व डिटेल्स समोर येतील.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कुंडमळा येथील घटनेतील मृत आणि जखमी व्यक्तींबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
हे ही वाचा : Pune News : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 5 जण ठार; 25 ते 30 लोक वाहून गेले, चिमुकल्यांचाही समावेश!
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात, प्रत्येक घटनेवर लक्ष!
या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे.
काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.
6 जणांना वाचविण्यात आले यश!
6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत.
त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली.
कुंडमळा पूल दुर्घटनेबाबत अजित पवार काय म्हणाले?
कुंडमळा घटनेबाबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, कुंडमळा घटनेबाबत वेगवेगळी माहिती मिळत आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी गेलेले आहे. आजूबाजूच्या नगरपालिकेची पथके देखील तिथे दाखल झालेली आहे.
प्रथमदर्शनी सांगण्यात येते की, तिथे असणारा लोखंडी पूल फार सडलेला होता. त्याठिकाणी जास्त लोक उभे राहिले. तसेच त्यावरून दुचाकी पण जात होत्या. अतिभार झाल्याने तो पूल कोसळला आहे. दुसरी बाब म्हणजे, त्या ठिकाणी आठ कोटींचा एक पूल आधीच मंजूर केलेला आहे. जिल्हाधिकारी यासंदर्भात अधिक माहिती मला सांगणार आहेत.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications