तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आरोप, म्हणाले- 'अडीच वर्षांचा विलंब..'
Mumbai Metro 4 Project Inauguration : मेट्रो ४अ च्या चाचणीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला, पण याचवेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "२०१९ पर्यंत आम्ही प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला होता, पण त्यानंतर आलेल्या सरकारने कामाला अक्षरशः ब्रेक लावला. त्यामुळे हा प्रकल्प अडीच वर्षे लांबला," असा थेट आरोप फडणवीसांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, जर हा विलंब झाला नसता तर आज संपूर्ण ५८ किमीच्या मार्गिकेचे उद्घाटन झाले असते, ज्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असता. एकप्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर मोठा आरोप केला, आगामी काळात या मुद्द्यावरुन राजकारण तापणार अशी चिन्हे असून मविआचे नेते आता काय उत्तर देणार हे ओत्सुक्याचे ठरेल.
मेट्रो मार्ग-4 व 4-अ के पहले चरण की टेस्टिंग आज हो रही है। प्रतिदिन 13 से 14 लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में महाराष्ट्र में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी, उसको एक बड़ी गति मिली है।
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 22, 2025
(पत्रकार परिषद |… pic.twitter.com/bpgscROzyN
मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ च्या पहिल्या टप्प्याची चाचणी आज होत आहे. दररोज १.३ ते १४ लाख स्थलांतरित त्यावरून प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मेट्रो बांधकाम उपक्रमाला लक्षणीय गती मिळाली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रकल्पाचे भविष्य आणि प्रवाशांना होणारा फायदा
मेट्रो ४ आणि ४अ या दोन्ही मार्गांची एकूण लांबी ३५ किमी आहे आणि यात ३२ स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पावर सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही संपूर्ण मार्गिका सुरू झाल्यावर दररोज सुमारे १३ लाख ४७ हजार प्रवासी प्रवास करतील. मोघरपाडा येथे ४५ हेक्टर जागेवर डेपोचे काम सुरू आहे, जो मेट्रो ४, ४अ, १० आणि ११ ला जोडला जाईल.
हेही वाचा : मोठी बातमी! वीज दरात सवलत! फडणवीस सरकारकडून मुदतवाढ, मंत्रीमंडळ बैठकीचे 4 मोठे निर्णय वाचा
मुंबईतील सर्वात लांब मार्ग बनणार मेट्रो ४
मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की, हा मार्ग मुंबई, ठाणे आणि पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडेल. जेव्हा तो वडाळा-सीएसएमटी मेट्रो ११ ला जोडला जाईल, तेव्हा तो मुंबईतील सर्वात लांब, ५५ किमीचा मार्ग बनेल. यामुळे प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल, तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे दररोज तब्बल २१ लाख प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : दिल्लीत हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीस भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष? राजकारणात भूकंपाची शक्यता
कधी पुर्ण होणार कामं?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. "पुढील वर्षभरात जास्तीत जास्त टप्पे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर काही कामे २०२७ पर्यंत पूर्ण होतील," असे आश्वासन त्यांनी दिले.












Click it and Unblock the Notifications