Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अखेर 11 व्या दिवशी महायुतीचा सत्तास्थापनेचा दावा! 237 आमदारांच्या पाठिंब्याचे राज्यपालांना दिले पत्र

Mahayuti claim of establish power : महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले.

यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड उपस्थित होते. तसेच, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन, भाजप नेते विजय रूपाणी देखील उपस्थित होते.

Mahayuti claim of establish power

वर्षावर झाली महायुतीची बैठक

दरम्यान, राजभवनात दाखल होण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर, हे तिन्ही नेते सत्ता स्थापनेसाठी एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षासह आमच्या महायुतीतील नेत्यांच्या सहीचे पत्र आज राज्यपालांकडे मी दिले आहे. शिवसेनेच अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावे असे शिंदे यांनी पत्र दिले. त्यासोबतच अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याच आशयाचे पत्र देत राज्यपालांकडे विनंती केली आहे. सर्व आमच्या मित्रपक्षांनीही हीच विनंती केली आहे. या विनंतीचा मान ठेवून आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी अनुमती दिली.

हेही वाचा : Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसांबाबत विचारले जातात 'हे' 8 प्रश्न, काय आहेत याची उत्तरे? जाणून घ्या

सीएम, डिसीएम केवळ तांत्रिक पद

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्कवर शपथविधी होत आहे. सर्व निर्णय आम्ही पुर्वीसारखेच घेणार आहोत. मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही तिघेही आजपर्यंत एकत्रित निर्णय घेत आलो आहोत. यानंतर पुन्हा असेच निर्णय घेतले आहे. मी स्वतः एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांना विनंती केली की, त्यांनी मंत्रिमंडळात राहावे. ही शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची इच्छा आहे असे त्यांना सांगितले आहे आमची ती विनंती त्यांनी मान्य केली आहे. आम्ही महायुती म्हणून जी आश्वासने आम्ही दिली ते पुर्ण करु असा विश्वास मी देतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे सर्व नेते, महायुतीचे सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! नगरसेवक ते CM, जाणून घ्या संपूर्ण जीवनगाथा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+