मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बाष्पूयुक्त वाऱ्याचा भडीमार थंडी वाढली! 'या' भागात पावसाचा इशारा!
Maharashtra Weather Update : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीनंतर राज्यातही जोरदार गार वारे वाहत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.
पारा अजून घसरु शकतो..
थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील काही भागातील थंडीदेखील या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कमी झाली आहे. साधारण पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 14 आणि 15 जानेवारीला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भातील किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे.
दिल्लीत थंडीचा कहर!
थंड वारे आणि धुक्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि काश्मीरसह इतर राज्यांमध्ये थंडीमुळे लोकांना घरातच कोंडून राहावे लागत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत तापमानात घसरण आणि थंडीची लाट वाढण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी (13 जानेवारी) दिल्ली-एनसीआरमध्ये सूर्यप्रकाशामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी उत्तर-पश्चिमी थंड वारे पुन्हा थंडी वाढवण्याच्या तयारीत आहेत.
मकर संक्रांतीनंतर तापमानात आणखी घट
मकर संक्रांतीनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर प्रयागराजमध्ये महाकुंभ स्नानासाठी आलेल्या भाविकांना थंडीचा सामना करावा लागला. येत्या काही दिवसांत राज्यातील किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.
राजस्थानच्या पूर्व भागात थंडीची लाट आणि धुक्याचा प्रादुर्भाव आणि पश्चिम भागात कोरडे हवामान. जयपूरसह अनेक भागात थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. येत्या 14 जानेवारी रोजी राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काश्मीर: बर्फवृष्टीची शक्यता काश्मीरमध्ये आकाश निरभ्र आहे, परंतु पारा सतत घसरत आहे. -8.4 अंश सेल्सिअससह पहलगाम हे सर्वात थंड क्षेत्र होते. IMD ने 16 जानेवारी रोजी उंच भागात हलक्या हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.












Click it and Unblock the Notifications