नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गारठा वाढला! पारा आणखी घसरणार, युपीत थंडीचा कहर जाणून घ्या आजचे हवामान
Maharashtra Weather Update : राज्यात नवीन वर्षाची धूम सुरु असतानाच उत्तरेकडील गार वाऱ्यांनी महाराष्ट्र येत्या काही दिवसांत पुन्हा गारेगार होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच तापमानात घट दिसून आली असून गारठा वाढला आहे, तर दुसरीकडे येत्या काही दिवसांत आणखी तापमानात घट होणार असून दुपारी ऊन तर रात्री थंडावा असू शकतो असा अंदाज आहे.
मराठवाड्यातील हवामान कसे राहणार
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील हवामान सामान्यतः सौम्य आणि थोडे थंड असण्याचा अंदाज आहे आज सकाळी आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवू शकते. विशेषतः मराठवाड्यातील पाच ते सहा जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये तापमान 22 ते 28 डिग्री सेल्सियस राहील. रात्री तापमान घसरून 15 ते 18 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते.

ढगाळ वातावरण
मराठवाड्यासह इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवामान थंड राहणार हे स्पष्ट अशले तरीही पावसाचा अंदाज मात्र नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे हवामान सौम्य राहील.
हेही वाचा Maharashtra Weather : नवीन वर्षात थंडीचा जोर! कसा राहणार गारठा अन् आजचे हवामान सविस्तर जाणून घ्या
नवीन वर्षाचे हवामान अपडेट
- नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याची थंडी आणि धुक्याने झाली. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये थंडीने आपला जोर दाखवला आहे.
- सोसाट्याचा वारा आणि थंडीच्या लाटा तसेच आकाशातून पडणारे दव यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे.
- थंडीपासून दिलासा मिळण्यास वेळ लागणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
- दिल्ली हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार, पहिल्या जानेवारीपासून म्हणजेच बुधवार (1 जानेवारी 2025) पासून थंडीच्या लाटेचा प्रभाव तीव्र होणार आहे. ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट होईल.
- येलो अलर्ट आता मागे घेण्यात आला असला तरी थंडीचा प्रभाव अजूनही कायम राहणार आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुडगाव येथे दिवसाचे कमाल तापमान 16-17 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 8-9 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
- 6 जानेवारीपर्यंत हवामानात विशेष बदल होणार नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
हेही वाचा महाराष्ट्रात आज कुठे पाऊस पडणार! या जिल्ह्यांत हवामान विभागाचा रेड, ऑरेंज अलर्ट, वाचा ताजे अपडेट्स
उत्तर प्रदेशात थंडीचा कहर
उत्तर प्रदेशातील अनेक भागात कडाक्याची थंडी सुरूच आहे. थंड वारे आणि धुक्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसाही थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. हवामान विभागाने सांगितले की, राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे. राजधानी लखनऊमध्ये कमाल तापमान 14.1 अंश सेल्सिअस तर किमान 12 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुलंदशहरमध्ये सर्वात कमी तापमान 7 अंश सेल्सिअस होते.
हेही वाचा तुमच्या हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा! GF, Bfसाठी खास मेसेजे वाचा












Click it and Unblock the Notifications