स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : शरद पवारांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान, वाचा बैठकीतील इनसाईड स्टोरी
Sharad Pawar on Maharashtra Local Body Election 2025 : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तर कोणासोबत युती करायची अन् कोणासोबत नाही, यासंदर्भात त्यांन पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं, यांसदर्भातील माहिती विश्वसनिय सूत्रांकडून देण्यात आली. चला तर वाचा इनसाईड स्टोरी.

भाजपसोबत युती नाहीच!
शरद पवार यांनी पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपला मार्ग स्पष्ट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षासोबत युती करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
अजित पवारांसोबतचा मार्ग मोकळा
सूत्रांनुसार, शरद पवारांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा मार्ग शरदचंद्र पवार पक्षासाठी मोकळा झाला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती नको, अशी भूमिका घेतल्यामुळे, महाविकास आघाडीची भाजपविरोधी भूमिका आगामी निवडणुकीत अधिक स्पष्ट होणार आहे.
मूळ ओबीसींना उमेदवारीमध्ये प्राधान्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपाच्या धोरणाबाबतही शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. या धोरणाचे केंद्रस्थान ओबीसी समाज असणार आहे. आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी प्रमाणपत्रधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना पवारांनी दिल्या आहेत.
जर मूळ ओबीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार उपलब्ध झाला नाही, तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांचा विचार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सूत्रांनुसार, ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण पडलं आहे, तिथं मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी. मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका, असा संवेदनशील सल्लाही पवारांनी बैठकीत दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले आहे, ज्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. पक्षाने लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत १० जागांवर विजय मिळाला












Click it and Unblock the Notifications