Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात? महिलांचे 58 अश्लिल व्हिडिओ, फार्महाऊसवर सीक्रेट कॅमेरे

Who is Astrologer Ashok Kharat : नाशिकमध्ये आध्यात्मिक गुरु आणि नामांकित ज्योतिषी म्हणून मिरवणाऱ्या एका 'हायप्रोफाईल' चेहऱ्याचा खरा आणि भीषण चेहरा समोर आला आहे. 'कॅप्टन' या नावाने प्रसिद्ध असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु अशोक खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेनंतर समोर आलेले पुरावे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

Who is Astrologer Ashok Kharat

केबिनमध्ये गुप्त कॅमेरे आणि ५८ महिलांचे व्हिडिओ

पोलिसांनी केलेल्या छाप्यात आरोपी खरात याच्याकडून एक पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल ५८ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. आरोपी आपल्या कॅनडा कॉर्नर येथील ऑफिस आणि सिन्नरमधील फार्महाऊसवर 'ग्रहशांती' किंवा 'दोष निवारण' करण्यासाठी येणाऱ्या महिलांना नशीला पदार्थ देऊन त्यांचे शोषण करायचा आणि गुप्त कॅमेऱ्यांच्या साहाय्याने त्याचे रेकॉर्डिंग करायचा, असे तपासात उघड झाले आहे.

पूजेच्या नावाखाली काळी कृत्य!

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ६७ वर्षीय खरातने तिला संमोहित करून आणि गुंगीचे औषध देऊन तिचे लैंगिक शोषण केले. एका व्हिडिओमध्ये तर आरोपी महिलेच्या डोक्यावर कलश ठेवून तिच्यासोबत अघोरी कृत्य करताना दिसत आहे. 'मर्चेंट नेव्ही'चा माजी अधिकारी असलेल्या खरातने आपल्या ज्योतिषविद्येचा वापर करून अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि बड्या व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

राजकीय वर्तुळात खळबळ

सिन्नरच्या मिरगाव येथील 'ईशान्येश्वर मंदिर' ट्रस्टचा तो अध्यक्ष होता. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारण्यांची ये-जा होती. आरोपीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो आढळले आहेत. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, हे व्हिडिओ ब्लॅकमेलिंग किंवा 'हनीट्रॅप'साठी वापरले जात होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांचे आवाहन

नाशिक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी ॲक्ट आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितांची संख्या मोठी असण्याची शक्यता असल्याने, इतर महिलांनी न घाबरता पुढे यावे, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अशोक खरात याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्याकडे ५८ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. खरात हा 'कॅप्टन' आणि ज्योतिषी म्हणून ओळखला जात असे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्याने राजकारणी, सेलिब्रिटी आणि बड्या अधिकाऱ्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले होते. याच संपर्काचा फायदा घेऊन तो महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप आता होत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+