Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका

Ashok kharat arrest : राज्याच्या राजकीय आणि उच्चभ्रू वर्तुळात वावरणारा स्वयंघोषित 'कॅप्टन' आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली प्रभाव पाडणारा अशोक खरात याच्या अटकेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ashok kharat arrest

५८ अश्लील व्हिडिओ आणि प्रभावशाली व्यक्तींच्या सहभागाच्या चर्चेने हे प्रकरण महाराष्ट्राची 'एपस्टीन फाईल' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे, महाराष्ट्राची एपीस्टिन फाईल उघडल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी करुन या प्रकरणाशी संबंधित सत्तेत बसलेल्या नेत्यांवर तोफ डागली.

नेमकं प्रकरण काय आहे? (अधिकृत घटनाक्रम)

अशोक खरात याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्याकडे ५८ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. खरात हा 'कॅप्टन' आणि ज्योतिषी म्हणून ओळखला जात असे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्याने राजकारणी, सेलिब्रिटी आणि बड्या अधिकाऱ्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले होते. याच संपर्काचा फायदा घेऊन तो महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप आता होत आहे.

सुषमा अंधारे यांचे खळबळजनक आरोप

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. अंधारे यांच्या मते, "रुपाली चाकणकर यांना खरातच्या कृत्यांची माहिती एक वर्षापूर्वीच होती. 'खबरदार पुढारी' या स्थानिक वृत्तपत्राने जेव्हा खरातचे कारनामे उघड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चाकणकर यांनी त्या पत्रकारावर दबाव आणून माफीनामा घेतला," असा दावा अंधारे यांनी केला आहे.

चारित्र्यहननाचा आरोप

पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी चाकणकर यांनी काही महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याचा आरोप करत, त्यांना महिला आयोगावर ठेवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसची (तटकरे गट) कोणती राजकीय अपरिहार्यता आहे," असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

रुपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण

या आरोपांनंतर रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले की, "शिवनिका संस्थान ट्रस्ट हे एक महादेव देवस्थान असून तिथे सामाजिक कार्यक्रम होतात. त्यामुळे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींप्रमाणे त्याही या ट्रस्टच्या कामाशी जोडल्या गेल्या होत्या."

'वैयक्तिक माहिती नाही' - चाकणकर

"अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही" असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील आणि दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे

१. व्हिडिओमधील चेहरे कोण?

  • जप्त करण्यात आलेल्या ५८ व्हिडिओंमध्ये नेमक्या कोणत्या महिला आहेत आणि त्यात काही प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
  • खरात इतकी वर्षे खुलेआम हे रॅकेट कसे चालवत होता आणि त्याला कोणाचे राजकीय संरक्षण होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
  • शक्ती आणि सत्तेच्या जवळ वावरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तक्रार करण्यास पीडिता का घाबरतात, हे या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+