EVM, निकालावर शंका! काँग्रेसच्या आक्षेपांना निवडणूक आयोग देणार उत्तर, 3 डिसेंबरला बोलावली बैठक
Election Commissions response to Congress : महाराष्ट्रातील निवडणूक निकालांमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. हे बहुमत अपेक्षेपेक्षा जास्त आहे असे खुद्द महायुतीचेच नेते म्हणत होते, त्यादरम्यानच इव्हिएम मशीनवर शंका घेण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांनी आणि त्यांचे सर्वोच्च नेते शरद पवारांनीही यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात इव्हिएमविषयी शंका आहेत. या सर्व शंका आणिआक्षेपाचे निरसन केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सर्व य समस्यांचे निराकरण करण्याचे आणि त्यांचे म्हणणे वैयक्तिकरित्या ऐकल्यानंतर लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसला दिलेल्या अंतरिम उत्तरात, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या सहभागासह पारदर्शक मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवरही भर दिला आहे.

निवडणूक आयोग घेणार बैठक
निवडणूक आयोगाने (ECI) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) सोबत 3 डिसेंबर 2024 रोजी निवडणूक निकालांबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व कायदेशीर मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे.
हेही वाचा : ईव्हीएम हॅक करता येते... महादेव जानकरांच्या दाव्याने खळबळ; म्हणाले, मी स्वतः...
निवडणूक निकालांबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, ECI ने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसंदर्भात भाष्य केले आहे. पारदर्शकतेसाठी सतत केलेल्या प्रयत्नांची माहिती आयोगाकडून देण्यात आली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, निवडणुकीत मतदानापासून मतपत्रिकांच्या मोजणीपर्यंत निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग असतो. समोरासमोर बैठकीनंतर पक्षाच्या सर्व न्याय्य समस्या लेखी स्वरूपात मांडण्याचे आश्वासन भारतीय निवडणूक आयोगाने दिले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमदार झालेल्या 'त्या' 21 महिला कोण? वाचा संपूर्ण यादी
इव्हीएमवर काय म्हणाले महादेव जानकर?
ईव्हीएमबाबत बोलताना महादेव जानकर म्हणाले, ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळेच महायुतीच्या एवढ्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. आम्ही याविरोधात देशभर आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येते. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळे मला सगळे माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, हे सगळे त्यांचेच आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालंय, असा थेट आरोप जानकर यांनी केला.












Click it and Unblock the Notifications