बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पुण्यातील बडा नेता होता लॉरेन्स गॅंगच्या निशाण्यावर; कोणी केला खुलासा
Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एका मोठ्या नेत्यालाही लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने टारगेट करण्याचे ठरवले होते. या टोळीने हत्येचा कट देखील रचला होता, असा धक्कादायक खुलासा मुंबई क्राईम ब्रँचने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एका मोठ्या नेत्यालाही लॉरेन्स बिश्नोई टोळीने लक्ष्य केले होते. या टोळीने त्या नेत्याच्या हत्येचा कट रचला होता आणि या कामाची जबाबदारी त्यांच्या नेमबाजांवर दिली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हत्येसाठी वापरले जाणारे पिस्तूल जप्त करण्यात आल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर नेत्याचे नाव अद्याप माध्यमांसमोर दिले नाही.

रेकी झाली की नाही, तपास सुरू?
या टोळीच्या प्लॅनची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने पुणे पोलिसांना सतर्क केले असून या प्रकरणात आरोपींनी काही रेक केली होती का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. गेल्या शुक्रवारी बाबा सिद्धी हत्याकांडातील शूटर गौरव विलास अपुणे याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने तयार केलेल्या 'प्लॅन बी'चा गौरव अपुणे हा भाग असल्याचे तपासात समोर आले आहे. 'प्लॅन ए' अयशस्वी झाल्यास, 'प्लॅन बी' अंतर्गत हत्या करण्यात येणार होती, असेही सांगण्यात आले.
झारखंडमध्ये गोळीबाराचा सराव
यापूर्वी अटक करण्यात आलेला अपुणे आणि दुसरा आरोपी रूपेश मोहळ यांनी झारखंडमध्ये जाऊन गोळीबाराचा सराव केल्याचेही पोलिस चौकशीत उघड झाले आहे. या दोघांना 28 जुलै रोजी नेमबाज शुभम लोणकर याने झारखंडला पाठवले होते, तेथे त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला आणि त्यानंतर 29 जुलै रोजी पुण्याला परतले. यानंतर त्यांनी शुभम लोणकर यांच्याशी संपर्क साधला. मुंबई क्राईम ब्रँच आता झारखंडमध्ये ही कसरत कुठे झाली याचा शोध घेत आहेत, असेही सांगण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications