Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पहलगाम हल्ल्याचा परिणाम: पाणीबाणीनंतर पाकिस्तानात औषधांचाही तुटवटा निर्माण होणार; उचलले हे पाऊल

pakistan News pharma product supplies : जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक निर्बंध लावले आहेत. त्यानंतर पाकिस्तान देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद करण्याबरोबरच, भारतासोबत होणारे लघु व्यापारही बंद केलेत. मात्र, आता पाकिस्तानलाच या निर्णयाची सर्वात मोठी किंमत मोजावी लागणार आहे. विशेष करुन फार्मा इंडस्ट्रीला मोठा दुष्परिणाम भोगावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतासोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवल्यानंतर पाकिस्तानच्या मेडिकल क्षेत्राला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तानमधील अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी औषधांचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी इर्मजन्सी प्लॅन आखण्यास सुरूवात केली आहे.

काही मीडियाच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानात आगामी काळात पाणीबाणी निर्माण होईल, त्याचपाठोपाठ औषधांचा तुटवडा देखील निर्माण होण्यास विलंब लागणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकंदरीत, भारत पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था कोलमडण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Pahalgam attack

भारतातून 40 टक्के औषधांचा कच्चा माल पाकला जातो

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान औषधांसाठी कच्च्या मालाच्या 30-40% भाग भारतातून आयात करतो. भारतातून तयार उत्पादने, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्करोगविरोधी लागणारी औषधी असो किंवा जैविक उत्पादने, लस आणि सीरम, विशेषतः रेबीजविरोधी लस आणि साप चावल्यानंतर लागणारी औषधी आयात करतो.

हे ही वाचा : पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांचे घरे उद्धवस्त, 60 ठिकाणी छापे, NIAकडे तपास!, वाचा- आर्मीची संपूर्ण मोहीम

भारतासोबत सर्व प्रकारचे व्यापार स्थगित करण्याची पाकिस्तान सरकारने स्पष्ट घोषणा केली असली तरी, आरोग्य मंत्रालयाला अद्याप औषध आयातीची स्थिती स्पष्ट करणारे कोणतेही अधिकृत निर्देश मिळालेले नाहीत. मेडिकल इंडस्ट्रीला भीती आहे की, पुरवठा साखळीतील व्यत्यय आल्यास भविष्यात गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते.

भारत पाकिस्तानला सक्रिय औषध घटक (API) सह अनेक वैद्यकीय उत्पादने निर्यात करतो. आता, भारतासोबतचा व्यापार थांबल्यानंतर, DRAP चीन, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये त्याचा पर्याय शोधत आहे. त्यामुळे पाकिस्तान पर्यायी व्यवस्था करू पाहत असले तरी ते तितके सोपे देखील नाही.

हे ही वाचा : पहलगाम हल्ला: अतिरेक्यांनी पॅन्ट काढायला लावून खतना तपासली; काय असते खतना? कशी करतात? महत्त्व काय?

पहलगाम दहशतवादी हल्ला , 28 निष्पापांचा गेला बळी

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 28 जणांची गोळ्या घालून हत्या केली, ज्यात 26 पर्यटक होते. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील ही सर्वात घातक दहशतवादी घटना होती.

पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LET) चा एक भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने यापूर्वी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु नंतर ते आपल्या दाव्यापासून मागे हटले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी, कट रचणारे आणि त्यांच्या सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार केलेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+