‘आविष्कार अवॉर्ड्स २०२६’ - सर्जनशील धाडसाचा कौतुक सोहळा!

'आविष्कार' या शब्दाला कोणत्याही अनुवादाची गरज लागत नाही. त्याचा अर्थ आहे नवसंशोधन. कल्पकतेने कृतीचे रूप घेण्याचा एक दुर्मिळ क्षण. जेव्हा सामान्य बुद्धीला केवळ अडथळे दिसतात, तिथे संधी शोधून काढण्याची एक शिस्त. आपल्या एकाकी विश्वासाचे रूपांतर अभिनव उद्योगात करण्याची एक दीर्घ वाटचाल. यात हे नवसंशोधक टिकून राहतात, इतरांना प्रेरणा देतात आणि स्वतःसोबतच, सभोवतालच्या जगालाही शांतपणे बदलतात.

एकीकडे, एक संस्थापक आधीचे दहा नकार पचवून, अजिबात न खचता अकराव्यांदा आपले स्वप्न नव्या उमेदीने मांडत आहे. दुसरीकडे, तीन पिढ्यांचा वारसा असलेल्या उद्योगाचा वर्तमान वारसदार, स्वतःच्या हातांनी हे साम्राज्य उभारणाऱ्या वडिलांना पटवून देत आहे की, आजच्या काळात टिकून राहण्यासाठी आपल्या कौटुंबिक उद्योगाची पुनर्रचना करणे का आवश्यक आहे. या घडामोडी भारताच्या विकासातील उपेक्षित कथा नाहीत, तर त्या या विकासाचा कणा आहेत.

Aavishkar Awards

'पुणे टाईम्स मिरर' प्रस्तुत 'आविष्कार अवॉर्ड्स' याच कल्पक व धाडशी सर्जक कथांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित केला जातो. कोणतीही चकचकीत, कृत्रिम मांडणी न करता, चुकांनी भरलेली, त्यातून धडा शिकलेली, हट्टी दृष्ट्यांच्या आणि अपार-अथक कष्टाने मिळवलेल्या विजयांची अस्सल कहाणी सांगण्यासाठी हा कौतुक सोहळा आहे. उद्योजकतेच्या धैर्याचा, कल्पकतेचा उत्सव म्हणून याची संकल्पना आखली गेली आहे आणि अल्पावधीतच हा पुरस्कार सोहळा, पुण्यातील उद्योगजगतामध्ये, सर्वाधिक उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा पुरस्कार समारोह झाला आहे.

या विशेष क्षणासाठी घडवलेली संकल्पना

या वर्षी निवडलेले बोधवाक्य आहे, 'बिल्डिंग टुमारो: इनोव्हेशन, एंटरप्राइज अँड द फ्युचर ऑफ इंडिया ' (उद्याची उभारणी: नवसंशोधन, उद्योग आणि भारताचे भविष्य). हे केवळ एक घोषवाक्य नसून एक सखोल निरीक्षण आहे. हा देश आता जगातील विकसित अर्थव्यवस्थांच्या मागे चालण्यावर समाधानी नाही; तर पूर्ण आत्मविश्वासाने तो त्याच्या स्वविकासाच्या अभिनव कल्पना लिहू लागला आहे. आणि नवलेखन करणारे हे नवोद्योजक, वातानुकूलीत कार्यालयात बसणारे नाहीत. ते असे उद्योग संस्थापक आहेत जे बातम्यांचे मथळे होऊ शकणार नाहीत अशा अनाकर्षक पण आवश्यक व्यवसायांना जन्म देत आहेत. हे नवतंत्रज्ञ अस्तित्वात न आलेल्या बाजारांसाठी आपली उत्पादने तयार करीत आहेत. हे असे उद्योगपति आहेत ज्या जुन्या यंत्रसामुग्रीतून नव्या आकांक्षांचे बुरूज उभारत आहेत.

'आविष्कार २०२६’ या नवनिर्मीतीचा शोध या आयोजित कार्यक्रमात घेणार आहे: प्रथम 'लीडरशिप कॉन्क्लेव्ह'च्या माध्यमातून, जिथे गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि अनुभवी व्यावसायिक एकत्र येऊन भारताची उद्योजकीय ऊर्जा कुठे चालली आहे यावर चर्चा करतील, त्याला संमती दर्शवतील आणि प्रसंगी वादही घालतील. त्यानंतर पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून, व्यावसायिकांनी घेतलेल्या कष्टाचे मनमोकळे कौतुक केले जाईल.

पुरस्कार सोहळा नाही, तर विश्वासाने एकत्र आलेला उद्योजक समूह

बहुतेक पुरस्कार सोहळे हे वरकरणी फार आकर्षक असले तरी त्यातून दिखावूपणाच जास्त दाखवला जातो. 'आविष्कार’ची रचना मात्र, जाणीवपूर्वक अधिक चांगल्या, वेचक-वेधक गोष्टीसाठी केली गेली आहे. ही अशी जागा आहे जिथे एखाद्या नवकल्पनेला अर्थसहाय्य करणारे आणि त्या कल्पनेचा पाठलाग करणारे, एकमेकांच्या सोबत बसतात. जिथे एखादा सरकारी धोरणकर्ता, व्यावसायिकांची अनौपचारिक चर्चा ऐकून उद्योजकांच्या कर्जाबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो; आणि जिथे पाच दशके जुन्या कौटुंबिक व्यवसायाला आणि दोन वर्षांच्या नवीन उद्योगाला समान महत्त्व दिले जाते, कारण दोघांनीही अपयशाचे सर्व धोके पत्करून, त्यांच्या व्यवसायाच्या उन्नतिसाठी सर्वस्व पणाला लावले होते.

हा कार्यक्रम एका अत्यंत साध्या आणि सर्वमान्य श्रद्धेवर आधारित आहे, की महत्त्वाकांक्षेला सोबतीची गरज असते. शून्यातून काहीतरी निर्माण करण्याचा प्रवास हा बाहेरून दिसतो त्यापेक्षा खूप जास्त एकाकी असतो. ती विशिष्ट एकाकी भावना अनुभवणाऱ्या व समजून घेऊ शकणाऱ्या लोकांसोबत घालवलेली एक संध्याकाळ, ही मिळणाऱ्या सन्मानचिन्हापेक्षा कितीतरी जास्त मोलाची असते.

प्रत्येक नवनिर्मात्याला या व्यासपीठावर स्थान आहे

'आविष्कार’चे सर्वात वेगळे वैशिष्ट्य हे, 'ते काय करत नाहीत’ यामध्ये दडलेले आहे. ते आपले सन्मान सोहळे अत्यंत प्रसिद्ध स्टार्टअप्स किंवा मोठ्या उलाढालीच्या उद्योगांपुरते मर्यादित ठेवत नाही. ते त्या उपेक्षित मध्यवर्ती क्षेत्रापर्यंत विस्तारतात जिथे प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेचा मोठा भाग वसलेला आहे आणि त्याची योग्य ती दखल घेतात. बातम्यांच्या मथळ्यांमध्ये क्वचितच येणारे उत्पादन उद्योग, शांतपणे जीव वाचवणारे आरोग्य क्षेत्रातील उद्योग, संपूर्ण पिढीच्या शिकण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करणारे शिक्षण उद्योग, स्वच्छ भविष्यासाठी आपल्या कारकिर्दीची पैज लावणारे पर्यावरणपूरक विचारांचे संस्थापक, आणि वर्षानुवर्षांच्या उलथापालथीनंतर जिद्दीने पुन्हा उभारणी करणारे किरकोळ विक्री व रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक. आपल्या पूर्वजांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या वारसांसाठी स्वतःचा कायापालट करणारे कौटुंबिक उद्योग आणि वेगाने विस्तारणारे स्टार्टअप्स या दोघांनाही या व्यासपीठावर समान आदर व स्थान दिला जाते. हे केवळ दिखाऊ औदार्य नाही. देशाची प्रगती ही केवळ एका उद्योगाने नाही, तर या सर्व लहान-मोठ्या व्यवसायांच्या द्वारे मिळून एकाच वेळी केली जात असते. त्याची क्वचितच गणना केली जाते. हा सोहळा अशा व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

सन्मानचिन्हापेक्षा जास्त काळ टिकणारे भांडवल

ज्याने उद्योग उभारला आहे अशा कोणालाही हे समजते की केवळ सन्मानाने व्यवसाय पूर्ण होत नाही. पण प्रसिद्धीमुळे अशी दारे उघडली जाऊ शकतात जी केवळ परिश्रमाने उघडू शकत नाहीत. 'आविष्कार’च्या आयोजकांनी याच वास्तवावर या सन्मान-संध्येची आखणी केली आहे. जिथे, उगवत्या उद्योगांना अशी प्रसिद्धी मिळण्याचे आश्वासन लाभते, ज्यासाठी एरवी त्यांना वर्षे लागू शकतात. मुद्रित आणि डिजिटल माध्यमांमधील प्रसिद्धी, ज्यांची भेट होणे कठीण अशा निर्णयक्षम व्यक्तींची उपस्थिती आणि कार्यक्रम समाप्तीनंतरही दीर्घकाळ टिकणारे नेटवर्क. स्वतःचे नाव, ब्रँड स्थापित करण्यासाठी झगडणाऱ्या नवोद्योजक संस्थापकासाठी, हातातील पुरस्कारापेक्षा या गोष्टी अधिक महत्त्वाची ठरू शकतात.

'आविष्कार’ची भविष्यवेधी वाटचाल

'आविष्कार’च्या भविष्याबद्दल बोलताना आयोजक त्यासाठी व्यावसायिक भाषेऐवजी सामुदायिकतेचा विचार करून बोलतात. पुणे शहराच्या व्यस्त दिनक्रमातील ही आणखी एक घटना न राहता, ती एक जिवंत परिसंस्था बनावी, जिथे संस्थापकांना त्यांच्या भविष्यातील सहकाऱ्यांचा शोध घेता येईल, गुंतवणूकदारांना त्यांच्या विश्वासास पात्र ठरणारी पुढची महत्त्वाकांक्षी कल्पना सापडेल, आणि प्रेक्षकांमधील एखादी तरुण व्यक्ती शांतपणे असा निश्चय करेल की तीही एक दिवस त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवेल. उद्योजकतेचा बहुतांश प्रवास खरोखर असाच सुरू होतो. बिझनेस प्लॅनपेक्षाही, अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचा पाठलाग करणाऱ्या कोण्या जिद्दी व्यावसायिकाला बघून.

या सोहळ्यात तुमचे सहर्ष स्वागत आहे

तुम्ही जर नवोद्योजक असाल जे अजूनही आपली कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्नरत आहेत, काळाच्या बरोबरीने चालत आधुनिकतेसाठी तयार झालेले कौटुंबिक उद्योग असाल, स्वतःच्या अपेक्षांपेक्षा मोठे झालेले मध्यम आकाराचे उद्योग असाल, किंवा नवीन बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेले प्रस्थापित ब्रँड असाल, तर या व्यासपीठावर येण्याची तुम्हाला ही सुवर्णसंधी आहे. 'आविष्कार अवॉर्ड्स २०२६’ हे केवळ उद्योगांना मान्यता देत नाहीत तर, ते लोकांच्या औद्योगिक मानसिकतेला पाठबळ देतात आणि त्यांना बोलण्याचे अन् सन्मानित होण्याचे निमंत्रण देतात.

नावनोंदणी आता सुरू झाली आहे. प्रकार, परीक्षक मंडळ, सोहळ्याचा तपशील आणि अर्जासाठी, कृपया येथे भेट द्या: https://aavishkar.punemirror.com/

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+