पहलगाम हल्ला: अतिरेक्यांनी पॅन्ट काढायला लावून खतना तपासली; काय असते खतना? कशी करतात? महत्त्व काय?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अतिरेक्त्यांनी क्रुरतने २७ पर्यटकांना ठार मारले. दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना प्रथम कलमा पढायला लावला व ज्यांना कलमा पढता आला नाही, त्यांना गोळ्या घातल्या. या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जाऊ लागली त्यात दहशतवाद्यांच्या क्रुरतेचे एक-एक खुलासे समोर येऊ लागले. त्यात आणखी एका खुलाशाने पुन्हा खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा मुस्लिम असल्याचा पुरावा पाहिला. ज्यांनी कलमा पढला त्यांच्याबाबत समाधान न झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांना त्यांची पँट काढायला लावली. त्यांची सुंता तपासणी केली. त्यानंतर गोळ्या घातण्यात आल्या.

हा प्रकारानंतर जेव्हा पोलिस व लष्करी पथक घटनास्थळी पोहोचलेले तेव्हा मृतदेहांची तपासणी करण्यात आली. त्यात २७ मृतांपैकी २० मृतदेहांच्या अंगावरील पँट उघड्या किंवा खाली ओढलेल्या आढळल्या. दहशतवाद्यांनी अनेक लोकांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म तपासला असंही सांगितलं गेलं. मुस्लिम धर्मात खतना केली जाते, हेच या दहशतवाद्यांनी शोधलं. त्यानंतर खतना म्हणजे नेमकी काय? ती कशी केली जाते? असे प्रश्न पुढे आले.
२० मृतदेहाच्या पॅन्ट तपासल्या
भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने सांगितले की, २७ पीडितांपैकी २० जणांचे कपडे जबरदस्तीने शरीराच्या खालच्या भागातून काढले गेले होते. त्यांच्या पँटची झिप काढून त्यांच्या पँट खाली खेचण्यात आल्या होत्या. ज्यामुळे त्यांचे अंतर्वस्त्रे किंवा गुप्तांग उघडे पडले होते. पीडितांचे नातेवाईक कदाचित इतके धक्क्यात होते की त्यांनी मृतदेहांवरील कपड्यांच्या स्थितीकडे लक्ष दिले नाही. कर्मचाऱ्यांनीही मृतदेह जसेच्या तसे उचलले, फक्त कफनने झाकले.
सुंता म्हणजे काय?
मुस्लिम आणि यहुदी लोकांमध्ये सुंता किंवा सुन्नत हा एक धार्मिक संस्कार मानला जातो. मुलाच्या जन्मानंतर काही वर्षांनी लिंगाची पुढची त्वचा काढून टाकली जाते. लिंगाची पुढची त्वचा काढून टाकणे याला सुंता म्हणतात. ही त्वचा लिंगाच्या वरच्या भागाला झाकते. जगातील अनेक देशांमध्ये मुलांची सुंता केली जाते. लहान वयात त्वचा मऊ असते, त्यामुळे त्यांना जास्त वेदना होत नाहीत. अनेक पंथांच्या धार्मिक पुस्तकांमध्येही सुंता करण्याचा उल्लेख आहे. सुंता हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. ज्यू समुदायात असे मानले जाते की सुंता करण्याची आज्ञा त्यांच्या देवाने दिली होती. मुस्लिम आणि आफ्रिकन देशांमध्ये राहणारे काही ख्रिश्चन देखील सुंता करतात. अनेक देशांमध्ये तर महिलांचीही सुंता केली जाते.
खतना आवश्यक आहे का?
धर्मबदल करताना प्रत्येकाच्या इच्छेला महत्त्व द्यावे, असा सांगितले जाते. इस्लाममध्ये खतना ही एक प्रथा असली तरी, इस्लाम स्वीकारताना ती बंधनकारक नाही. बहुतेक उलेमांचा असा विश्वास आहे की इस्लाममध्ये प्रवेश करण्यासाठी खतना करणे आवश्यक नाही. कुराणात त्याची चर्चा केलेली नसली तरी, ती मोठ्या प्रमाणात पाळली जाते. इस्लाममधील काही हदीसमध्ये याचा उल्लेख आहे. तथापि यहुदी धर्म स्वीकारणाऱ्या पुरुषाला सुंता करावी लागते. भारतातील मुस्लिम समुदायात खतना हा धर्माचा मुख्य निर्धारक आहे. भारतात मुस्लिम पुरुषांची खतना केवळ धार्मिक कारणांसाठी केली जाते.












Click it and Unblock the Notifications