Donald Trump's Tariff : ट्रॅम्पच्या 'टॅरीफ'चा भारतात कोणत्या क्षेत्राला होईल फायदा आणि नुकसान? वाचा
Donald Trump's Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांतून होणाऱ्या आयातीवर 'टैरीफ शुल्क' लावण्याचे धोरण जाहीर केले आहे. व्यापार असमतोल सुधारणे आणि अमेरिकन उद्योगांना बळकटी देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, यामुळे भारताला किती फायदा आणि नुकसान होणार याची चर्चा आता होत आहे.
भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यामुळे भारतावर दबाव वाढू शकतो. अमेरिका हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिकेचा वाटा 18 टक्के आहे आणि भारत या व्यापारात अमेरिकेला जास्त निर्यात करतो आणि तिथून कमी आयात करतो, अशी स्थिती आहे.

अमेरिकेने भारतावर किती टक्के टॅरीफ शुल्क लादले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्काची घोषणा केली आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के शुल्क लादले आहे. त्यामुळे भारतावरील दबाव वाढला आहे. याला टॅरिफ म्हणतात. त्यामुळे भारताच्या व्यापारातील नफा तोट्यावर आणि व्यापार विषयक धोरणावर परिणाम होऊ शकतो.
भारत सरकार टॅरीफसाठी किती तयार?
भारताने गेल्या काही आठवड्यात आपल्या टॅरिफ प्रणालीमध्ये बदल केले आहेत. भारताने 8,500 औद्योगिक वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. यामध्ये बोर्बन व्हिस्की आणि महागड्या हार्ले-डेव्हिडसन दुचाकीसारख्या अमेरिकन वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेला याचा फायदा होऊ शकतो.
भारताने अमेरिकेकडून आणखी तेल, एलएनजी आणि संरक्षण उपकरणे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. अधिकाऱ्यांनीही दरात आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत.
अमेरिकेच्या मागण्यांवर भारत करतोय विचार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत अमेरिकन कृषी उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याच्या अमेरिकन मागण्यांवर विचार करत आहे. नवीन दरांमुळे नॉन-टेरिफ व्यापार अडथळे दूर करण्यासाठी भारतावर दबाव वाढू शकतो. यामध्ये अपारदर्शक आयात निर्बंध आणि विशिष्ट आयातीवरील परवाना आवश्यकता समाविष्ट आहेत. अपारदर्शक म्हणजे हे नियम आणि निर्बंध स्पष्ट नाहीत आणि सहज समजत नाहीत.
भारताचे काय नुकसान होईल?
गुंतवणुकदार गुंतवणूक करण्यास कचरतील
- जागतिक आर्थिक सल्लागार डीव्हेरे ग्रुपचे सीईओ निगेल ग्रीन म्हणाले की, यूएस टॅरिफ भारताला पर्यायी व्यापार गट आणि धोरणात्मक भागीदारांच्या जवळ आणू शकतात. ते म्हणाले की यामुळे भारतीय निर्यात लगेचच कमी स्पर्धात्मक बनते. भारत चीनमधून जाणाऱ्या जागतिक भांडवलला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होतो. याचा अर्थ भारतावर अधिक कर आकारला गेला तर भारतातून वस्तू खरेदी करणे महाग होईल. यामुळे गुंतवणूकदार भारतात पैसे गुंतवण्यास कचरतील, असे नवभारत टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
- कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होईल?
- गोल्डमन सॅक्स म्हणतो की, उदयोन्मुख बाजारपेठेतील देशांच्या तुलनेत भारताची अमेरिकेला होणारी एकूण निर्यात सर्वात कमी आहे. त्यामुळे भारताला इतर देशांकडून जास्त वस्तू खरेदी करण्याची किंवा विकण्याची गरज नाही, त्यामुळे त्यावर शुल्काचा फारसा परिणाम होणार नाही.
- ट्रम्प यांच्या टॅरिफ असूनही, जागतिक अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.
- IMF च्या जानेवारीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार, भारत येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
- एसबीआयच्या विश्लेषणानुसार, भारतीय निर्यातीवर यूएस टॅरिफचा संभाव्य प्रभाव किरकोळ असेल. त्यात सुमारे 3 ते 3.5 टक्के घट होण्याचा अंदाज आहे. अहवालात म्हटले आहे की भारताचे निर्यात वैविध्य, मूल्यवर्धनावर भर, पर्यायी बाजारपेठेचा शोध आणि मध्य पूर्व मार्गे युरोप ते यूएस पर्यंत नवीन व्यापार मार्गांचा विकास यामुळे यूएस टॅरिफचे परिणाम कमी होतील.
- फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, व्हिएतनाम आणि बांगलादेश सारख्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपेक्षा भारतावर लादलेले शुल्क कमी आहे. यामुळे भारतीय पोशाख आणि फुटवेअर क्षेत्रांना मदत होऊ शकते. म्हणजेच भारतीय कपडे आणि शूज इतर देशांच्या तुलनेत स्वस्त होतील, ज्यामुळे त्यांची विक्री वाढू शकते.
- जवळपास 14 डाॅलर अब्ज किमतीची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि $9 अब्ज पेक्षा जास्त किमतीची रत्ने आणि दागिने हे यूएस टॅरिफचा फटका बसणाऱ्या प्रमुख क्षेत्रांपैकी आहेत. 26 टक्के टॅरिफ ऑटो पार्ट्स आणि ॲल्युमिनियम उत्पादनांवर लागू होणार नाही, परंतु ते ट्रम्पने यापूर्वी जाहीर केलेल्या 25 टक्के टॅरिफमध्ये समाविष्ट असतील.












Click it and Unblock the Notifications