कारगिल विजय दिवस, मोदींनी पाकिस्तानला पुन्हा दिला 'हा' इशारा
Kargil Vijay Diwas : कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहिदांना नमन केलं. कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथूनच आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा ही त्यांनी दहशतवाद्यांना दिला आहे.

बलिदान देणारे अमरच
पंतप्रधान मोदी म्हणाले, "राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात. हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी राहिल. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की, कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांच्या मध्ये होतो. मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता", असंही मोदींनी स्पष्ट केलं.
#WATCH | Ladakh: PM Narendra Modi says, "Pakistan has failed in all its nefarious attempts in the past. But Pakistan has not learned anything from its history. It is trying to keep itself relevant with the help of terrorism and proxy war. Today I am speaking from a place where… pic.twitter.com/HQbzjcVKVq
— ANI (@ANI) July 26, 2024
जवानांचं अजरामर साहस
मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, "भारत कायम शांततेसाठी प्रयत्न करतोय. त्याउलट पाकिस्तानने वारंवार आपला खरा चेहरा दाखवला आहे. कारगिलमध्ये सत्याच्या समोर, असत्य आणि आतंक्यांचा पराभव झाला. पाकिस्तानने जेवढी खोड काढली तेवढ्यावेळी त्यांना चारीमुंड्या चीत व्हावे लागले. पाकिस्तानने कधीही आपल्या इतिहासातून धडा घेतला नाही. आज मी ज्या कारगिलमधून बोलतोय, जिथे दहशतवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू जात असेल. मी दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत."
#WATCH | Ladakh: PM Narendra Modi says, "Pakistan has failed in all its nefarious attempts in the past. But Pakistan has not learned anything from its history. It is trying to keep itself relevant with the help of terrorism and proxy war. Today I am speaking from a place where… pic.twitter.com/HQbzjcVKVq
— ANI (@ANI) July 26, 2024
वाजपेयींनी दाखवली होती निधडी छाती
कारगिल युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. भारतीय सैनिकांनी टायगर हिलवर विजय मिळवला. मात्र तरीही पंतप्रधान वाजपेयी थांबायला तयार नव्हते. जोपर्यंत आम्ही प्रत्येक सीमेवरून या पाकिस्तानींना बाहेर काढत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. भारतीय लष्कराने कारगिल युद्धातील सर्वात महत्त्वाचे शिखर असणारं टायगर हिल 4 जुलैलाच ताब्यात घेतले होतं. पण त्यानंतर वाजपेयींच्या म्हणण्यांनुसार पाकीस्थानच्या सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी 26 जुलै ही तारीख उजाडली होती. त्यामुळेच टायगर हिल 4 जुलैलाच जिंकले असले तरी कारगिल विजय दिवस हा 26 जुलैला साजरा केला जातो.
टोलोलिंग व टायगर हिल महत्त्वाचे पाँईंट
टोलोलिंग हे NH-1 अल्फापासून अगदी जवळ म्हणजे, अगदी 3 किमी अंतरावर आहे. टायगर हिलच्या बाबतीतही असेच आहे. टायगर हिल हे NH-1 अल्फापासून 8-10 किलोमीटरवर आहे. टायगर हिलवरून NH-1 अल्फा अगदी स्पष्टपणे दिसून येते. ही दोन्ही ठिकाणे अशी आहेत, ती ताब्यात असल्यावर त्या रस्त्यावर दुश्मन कोणतीही हालचाल करू शकत नाही. त्यामुळे भारतीय सैनिकांना ही महत्त्वाची ठिकाणे घुसखोरांकडून ताब्यात घ्यायची होती. त्यातील टायगर हिल हे दहशतवाद्यांकडून 4 जुलैलाच ताब्यात घेतले होते मात्र इतर ठिकाणांवर विजय मिळवायला भारतीय लष्करारा 26 जुलैपर्यंत लढा द्यावा लागला होता.
Ladakh: Prime Minister Narendra Modi pays tribute to the heroes of the Kargil War at Kargil War Memorial on the occasion of 25th #KargilVijayDiwas2024 pic.twitter.com/xLiTpjE8cB
— ANI (@ANI) July 26, 2024
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications