PM Gramin Awas Yojana : पीएम ग्रामीण आवास योजनेची नवीन यादी जाहीर; तुमचे नाव यादीत आहे का? असे तपासा
PM Gramin Awas Yojana 2025 : भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) साठी सन २०२५ ची अद्ययावत लाभार्थी यादी जाहीर केली आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना पक्के घर मिळावे या उद्देशाने २०१६ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागात 'सर्वांसाठी घर' हे स्वप्न साकार होत आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत या योजनेअंतर्गत ३ कोटींहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे.

योजनेची आर्थिक मदत आणि उद्दिष्ट्य
या योजनेअंतर्गत सरकारकडून लाभार्थींना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये मैदानी क्षेत्रांसाठी १.२० लाख रुपये आणि डोंगराळ, दुर्गम क्षेत्रांसाठी १.३० लाख रुपये पर्यंतची थेट आर्थिक मदत पुरवली जाते. सरकारने २०२९ पर्यंत २.९५ कोटी घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
'आवास ॲप' (AwaasApp) आणि पारदर्शकता
PMAY-G मध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने 'AwaasApp' नावाचे एक मोबाइल ॲप्लिकेशन (Android App) आणले आहे. या ॲपद्वारे लाभार्थी.
त्यांच्या घराच्या बांधकामाची सद्यस्थिती थेट पाहू (Live Track) शकतात.
बांधकाम स्थळाचे जिओ-टॅगिंग (Geo-tagging) करू शकतात आणि तक्रारी देखील नोंदवू शकतात.
पहिल्या यादीनंतर लवकरच दुसरी लाभार्थी यादी देखील अपेक्षित आहे, ज्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींना पुन्हा संधी मिळेल.
योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
- PMAY-G चा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख निकष आहेत.
- लाभार्थी ग्रामीण भागाचा रहिवासी असावा.
- लाभार्थीकडे पक्के घर नसावे.
- तो अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), इतर मागास वर्ग (OBC), अल्पसंख्यक, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) किंवा भूमिहीन मजूर यापैकी कोणत्याही एका श्रेणीत मोडणारा असावा.
यादीत नाव कसे तपासायचे?
- लाभार्थी त्यांच्या नोंदणी क्रमांकाशिवायही ऑनलाइन किंवा मोबाइल ॲपद्वारे यादीत आपले नाव तपासू शकतात.
- सर्वप्रथम PMAY-G ची अधिकृत वेबसाइट pmayg.nic.in उघडा.
- वेबसाइटवर 'Stakeholders' विभागात क्लिक करा आणि त्यानंतर 'IAY/PMAYG Beneficiary' किंवा 'Search Beneficiary' पर्याय निवडा.
- तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसल्यास, 'Advanced Search' वर क्लिक करा.
- आपले राज्य, जिल्हा, गट (ब्लॉक) आणि गाव निवडून कॅप्चा (Captcha) भरा आणि 'Submit' वर क्लिक करा.
- 'Submit' केल्यानंतर, तुमच्या गावांतील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये मंजुरीची स्थिती आणि हप्त्यांसंबंधित माहिती देखील उपलब्ध असेल.
- ज्या पात्र व्यक्तींचे नाव यादीत नाही, ते PMAY-G पोर्टलवर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.
हेही वाचा : आधार मोबाईल नंबरला लिंक कसा करायचा, कुठे करायचा, घरी करता येतो का? लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक












Click it and Unblock the Notifications