आधार मोबाईल नंबरला लिंक कसा करायचा, कुठे करायचा, घरी करता येतो का? लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक
How to link Aadhaar mobile number : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. योजनेची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसेल, तर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करता येणार नाही आणि परिणामी, पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.

'लाडकी बहिण' ई-केवायसीसाठी आधार-मोबाईल लिंक करणे का आवश्यक?
लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार ओटीपी (OTP) सत्यापन आवश्यक असते. हा ओटीपी केवळ आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरच पाठवला जातो. त्यामुळे, जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसेल, तर...
ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहील
लाडकी बहिण योजनेत ई-केवायसी जर केली नाही तर तुमचा हप्ता थांबू शकतो आणि ईकेवायसीसाठी आधारला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. जर मोबाईल क्रमांकाला आधार लिंक नसेल तर त्यामुळे १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत असूनही तुम्ही ई-केवायसी करू शकणार नाही.
आधार-मोबाईल लिंकिंगबाबत प्रश्न तुमचे उत्तर आमचे
घरबसल्या करता येतो का?
नाही. सध्या आधारमध्ये मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी बायोमेट्रिक सत्यापन आवश्यक असते, जे घरबसल्या करता येत नाही.
मोबाईल लिंक कुठे करायचा?
- आधार नोंदणी केंद्रे (Aadhaar Enrolment Centres): UIDAI द्वारे चालवली जाणारी केंद्रे.
- पोस्ट ऑफिस (Post Offices): अनेक पोस्ट ऑफिसमध्ये आता आधार अपडेट सुविधा उपलब्ध आहे.
- अधिकृत 'आधार सेवा केंद्रे' (Aadhaar Seva Kendras): बँक किंवा सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत केंद्रे.
आधार मोबाईल क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया
१. अर्ज भरा: केंद्रावर जाऊन आधार सुधारणा/अपडेट फॉर्म भरा.
२. बायोमेट्रिक स्कॅन: तुमचा फिंगरप्रिंट आणि आयरीस स्कॅन घेतला जाईल.
३. मोबाईल नंबर नोंदवा: फॉर्मवर तुमचा नवीन/सध्याचा मोबाईल नंबर, ईमेल नोंदवा.
४. शुल्क भरा: यासाठी निश्चित शुल्क (सामान्यतः ₹७५) रुपये भरावे लागू शकतात पण काही ठिकाणी १०० रुपयेही घेऊ शकतात.
५. पोचपावती (Acknowledgement Slip) घ्या.
मोबाईल क्रमांक-आधार लिंकला किती कालावधी लागेल?
लागणारा कालावधी मोबाईल क्रमांक अपडेट झाल्यानंतर २४ ते ४८ तासांच्या आत आधारशी जोडला जातो आणि तुम्हाला पुष्टीकरण संदेश प्राप्त होतो. ई-केवायसीची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे. ज्या लाभार्थी महिलांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी आणि ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अन्यथा, 'लाडकी बहिण योजने'च्या पुढील हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications