मनमोहन सिंग यांची शेवटची इच्छाही राहिली अपूर्ण! पंतप्रधान होऊनही पूर्ण करू शकले नाही स्वप्न? वाचा
Manmohan singh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री 26 डिसेंबर रोजी रात्री निधन झाले.मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे अखेरचा श्वास घेतला. एम्सने सांगितले की, मनमोहन सिंग यांचे वयाशी संबंधित आजारांमुळे दुःखद निधन झाले.
मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत दोनदा भारताचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांची वैयक्तिक प्रतिमा अगदी स्वच्छ राहिली. भारतातील आर्थिक सुधारणांचे श्रेय मनमोहन सिंग यांना जाते. माजी अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आज मनमोहन सिंग आपल्यात नसताना त्यांची एक अपूर्ण इच्छा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मनमोहन सिंग त्यांचे कोणते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत?
मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतात झाला. हा भाग आता पाकिस्तानात आहे. मनमोहन सिंग यांच्या गावाचे नाव "गाह" आहे, जे पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात येते. 2004 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा या प्रकरणाची पाकिस्तानात खूप चर्चा झाली होती. मनमोहन सिंग यांच्या नावावर असलेली गाह गावात एक सरकारी शाळाही आहे. मनमोहन सिंग गव्हर्नमेंट बॉईज स्कूल असे या शाळेचे नाव आहे.
हेही वाचा : मनमोहन सिंग यांच्यावर शनीवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, किती आहे एकूण संपत्ती? वाचा
मनमोहन सिंग यांना होती फाळणीची वेदना
मनमोहन सिंग यांनीही सुरुवातीचे शिक्षण याच शाळेत केल्याचे सांगितले जाते. मनमोहन सिंग यांनाही देशाच्या फाळणीची वेदना सहन करावी लागली होती आणि स्वातंत्र्यानंतर ते कुटुंबासह सीमा ओलांडून पंजाबमधील अमृतसर येथे स्थायिक झाले. मनमोहन सिंग यांचे वर्गमित्र राजा मोहम्मद अली, गाह गावातील रहिवासी यांच्या मते, ते आणि मनमोहन सिंग चौथीपर्यंत एकत्र शिकले. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर राजा मोहम्मद अली यांनी एका पाकिस्तानी वाहिनीला सांगितले होते की, मनमोहन सिंग यांच्यामुळे आज त्यांचे गाव एक आदर्श गाव बनले आहे.
हेही वाचा : Manmohan Singh passed away Live: मनमोहन सिंग यांच्यावर उद्या सकाळी राजघाटावर होणार अंत्यसंस्कार
ही इच्छा राहीली अधुरी
मनमोहन सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मनमोहन सिंग यांच्या आजोबांची दंगलीत हत्या करण्यात आली होती. मनमोहन सिंग यांच्या हृदयावर आणि मनावर याचा खोल परिणाम झाला. याच कारणामुळे मनमोहनसिंग रावळपिंडीला गेले होते पण ते त्यांच्या गावी गेले नाहीत पण मनमोहन सिंग यांना त्यांच्या गावात जाऊन त्यांची शाळा पाहण्याची इच्छा होती. राजीव शुक्ला यांनी सांगितले होते की, मनमोहन सिंग यांनी त्यांना एकदा सांगितले होते की, त्यांना पाकिस्तानातील त्यांच्या गावी जायचे आहे. मनमोहन सिंग यांना तिथे जाऊन त्यांची चौथीपर्यंत शिक्षण घेतलेली जुनी शाळा बघायची होती.
हेही वाचा : Manmohan Singh Death : 5 वेळा बायपास शस्त्रक्रिया ते मधुमेह, मनमोहन सिंग यांना होत्या 'या' व्याधी
वडिलोपार्जित घर दंगलीत उद्धवस्त
मनमोहन सिंग यांचेही गाह गावात वडिलोपार्जित घर होते पण ते दंगलीत उद्ध्वस्त झाले. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना त्यांच्या गावाच्या विकासासाठी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना पत्रही लिहिले होते. पण पंतप्रधान होऊन किंवा पंतप्रधान नसतानाही मनमोहन सिंग त्यांच्या गावी जाऊ शकले नाहीत... त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. मनमोहन यांची ही इच्छा होती जी पूर्ण होऊ शकली नाही, असे लोक सोशल मीडियावर लिहित आहेत.












Click it and Unblock the Notifications