Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनमोहन सिंग यांच्यावर शनीवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, किती आहे एकूण संपत्ती? वाचा

Manmohan Singh Net Worth : : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मनमोहन सिंग यांची प्रकृती गुरुवारी संध्याकाळी खालावली, त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.

डाॅ. मनमोहन सिंग यांना रात्री 8:06 वाजता तातडीने रुग्णालयात आणण्यात आले होते. सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही आणि रात्री 9.51 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मनमोहन सिंग 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 पर्यंत दोनदा पंतप्रधानपद त्यांनी भूषवले. या काळात मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत केली होती.

Manmohan Singh Net Worth

शनीवारी अंत्यसंस्कार, सात दिवस दुखवटा

मनमोहन सिंग यांचे पार्थिव रात्री उशिरा घरी आणण्यात आले. कुटुंबीय, मित्र, राजकीय व्यक्ती आणि असंख्य चाहते, देशवासीय त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी पूर्ण सरकारी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : former PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 5 मोठे निर्णय, जे देश कधीही विसरणार नाही

मनमोहन सिंग नेट वर्थ (manmohan singh net worth)

  • मनमोहन सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत. जाणून घेऊया मनमोहन सिंग यांनी किती संपत्ती सोडली आहे...
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनमोहन सिंग यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे एकूण 15 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती आहे.
  • 2019 मध्ये राज्यसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे दिल्ली आणि चंदीगडमध्येही फ्लॅट आहे. एवढेच नाही तर मनमोहन सिंग यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते.
  • प्रतिज्ञापत्रानुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे 7 कोटी 72 लाख 54 हजार 370 रुपये रोख होते. त्याच वेळी, 12 लाख 76 हजार रुपयांची एनएएस आणि पोस्टल बचत योजना होती.
  • एवढेच नाही तर 3 लाख 86 हजार 500 रुपयांचे दागिनेही होते.
  • 2013 च्या प्रतिज्ञापत्रानुसार मनमोहन सिंग यांच्याकडे मारुती 800 कार होती. याव्यतिरिक्त, काही निवासी मालमत्ता आणि बँक ठेवी होत्या. त्यावेळी मनमोहन सिंग यांची एकूण संपत्ती 10.73 कोटी रुपये होती.
  • 11 वर्षांपूर्वी दिल्ली आणि चंदीगडमध्ये असलेल्या घरांची किंमत 7.27 कोटी रुपये होती. एवढेच नाही तर त्यांच्या एसबीआय खात्यात 3.46 कोटी रुपये ठेवी आणि गुंतवणूक होती.

हेही वाचा : Manmohan Singh passes away :अर्थव्यवस्थेला गती देणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जीवनगाथा वाचा

मनमोहन सिंह यांचा जन्म पंजाब प्रांतात झाला होता. त्यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले आणि त्यानंतर ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी सन्मान पदवी प्राप्त केली.

हेही वाचा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, PM मोदींकडून शोक व्यक्त, जाणून घ्या कुणाची काय प्रतिक्रीया?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+